लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, या मागणीकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी निवेदन सादर केले.चिमूर जिल्हा निर्माण व्हावा, याकरिता १९८३ पासून अनेक आंदोलने, निवेदन व पत्रव्यवहारद्वारे मागण केली जात आहे. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले. या आंदोलनदरम्यान ६ जानेवारी२००२ रोजी तहसील कार्यालयाची इमारत जाळण्यात आली होती. पोलिसांनी अनेकांनी अटक केली. त्यामुळे नागरिकांसाठी हा काळा दिवस ठरला होता. चिमूर जिल्हा निर्मितीची मागणी सर्वप्रथम स्वातंत्रसैनिक दामोदर काळे यांनी केली होती. त्यानंतर सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन चिमूर क्रांती जिल्हा कृती समिती गठित करून पाठपुरावा करत आहेत.शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष नरेंद्र राजूरकर प्रा. संजय पिठाडे, माधव बिरजे, मनीष नंदेश्वर, सुरेश डांगे, भरत बंडे, रामदास हेमके, राजू हिंगणकर, राजेंद्र लोणारे, सिंधु रामटेके, अनिल डगवार, प्रा. राम राऊत, प्रकाश बोकारे, अरूण लोहकरे, अतुल लोथे, विलास डांगे, उमेश शंभरकर, अभय धोपटे, रामकृष्ण राऊत, प्रवीण वरगंटीवार, डॉ. हेमंत जांभुळे आदी उपस्थित होते.काळे गुरूजींचे स्मरणचिमूर क्रांती जिल्हा कृती समितीद्वारे सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदारांना निवेदन देताना स्वातंत्र्यसैनिक दामोदर काळे गुरुजींची आठवण सर्वांना येत होती. चिमूर जिल्हा निर्मितीच्या प्रत्येक आंदोलनात ते अग्रणी होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. शासन दरबारी प्रभावीपणे पाठपुरावा करणारे लोकनेते म्हणून गुरूजीचे नाव कायम स्मरणात राहणार आहे.दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्याचिमूर जिल्हा निर्मितीकरिता प्रा. दादा दहिकार यांनी दोन हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन तहसीलदाराला देण्यात आले. मागील १५ दिवसांपासून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. २००२ मध्ये प्रा. दहीकर यांनी १३ दिवसांचा तुरूंगवास भोगला आहे. चिमूर जिल्हा निर्माण झाला नाही तर ‘जोडा मारो’ आंदोलन करण्याचाही त्यांनी इशारा दिला आहे.
चिमूर क्रांती जिल्ह्याची मागणी ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 9:37 PM
चिमूर क्रांती जिल्हा निर्माण करावा, या मागणीकरिता सर्वपक्षीय नेत्यांनी तहसीलदार संजय नागतिळक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी निवेदन सादर केले.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा असल्याचा कृती समितीचा दावा