चंद्रपूर : महसूल विभागात उपजिल्हाधिकारी संवर्गातील पाच जागासह ‘अ’ वर्गातील सात, ‘ब’ संवर्गातील ५९ यासह अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी, विकास कामांचा खोळंबा झाला आहे. एकाच अधिकाऱ्याकडे अतिरिक्त प्रभार असल्याने त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
चंद्रपूर जिल्हा महसूल प्रशासनात ‘अ’ वर्गात जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी संवर्गासह ४३ पदांचा आकृतिबंध मंजूर आहे. यातील ३६ पदे भरण्यात आली मात्र, भू-संपादन, रोजगार हमी योजना, अतिक्रमण, निवडणूक, उपविभागीय अधिकारी या घटकातील उपजिल्हाधिकारी व दोन तहसीलदार संवर्गातील पदे रिक्त आहेत.
जिल्हा महसूल विभागाच्या ‘ब’ वर्गात लेखाधिकारी, नायब तहसीलदार, निरीक्षण अधिकारी, उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक संवर्गासह ८७ पदांना मंजुरी आहे. मात्र यातील ६९ पदे भरण्यात आली असल्याची माहिती आहे.