ब्रह्मपुरी शहरालगत रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गावरून गोंदिया, बल्लारशाह पॅसेंजर, मालगाड्या, लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट रेल्वे गाड्या धावतात. त्यामुळे दिवसातून अनेकदा फाटक बंद होत असते. सोबतच रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला असलेल्या गतिरोधकांची उंची जास्त असल्याने याठिकाणी सुद्धा झटका बसून अनेकदा जड वाहने नादुरुस्त होत असल्याने मोठ्या प्रमाणात वारंवार वाहतूक कोंडी होत असते. रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून असतात. यामुळे अनेकदा गंभीर प्रकृती असलेला रुग्ण सुद्धा दगावू शकतो. प्रवासी, वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. या रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची निर्मिती केल्यास ही समस्या निकाली सुटेल, याकडे निवेदनातून लक्ष वेधले आहे. यावेळी योगेश राऊत, नरेश चौधरी उपस्थित होते.
ब्रह्मपुरी येथील रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:26 AM