खातेदारांनी बँकेतून पैसे काढल्यावर किंवा जमा केल्यावर बँक कर्मचाऱ्यांकडून खातेदाराजवळ असलेल्या पासबुकात वेळीच नोंदणी करून देण्यास बँकेतील कर्मचारी टाळटाळ करीत असतो. नोंदणी करायची असेल तर थांबा, दुपारी ३ वाजताच्या नंतर करून मिळेल, असे सांगण्यात येतात. नोदणी करण्याकरिता खातेदार आपली कामे धंद सोडून बँकेपुढे त्या नोंदणीकरिता ताटकळत उभे राहतील काय, हा एक मोठा प्रश्न आहे. अनेक खातेदाराच्या पासबुकात अनेक महिन्यापासूनच्या नोंदी झालेल्या नाहीत. त्यामुळे खातेदारास आपल्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा आहेत, हेसुध्दा माहीत नसते. यामुळे खातेदाराची गैरसोय होत आहेत. त्यामुळे वेळीच नोंद करून द्यावी, जणेकरून खातेदारास आपली किती रक्कम जमा आहेत. ते लक्षात येण्याकरिता वावगे ठरेल.
बँक प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी खातेदारांनी केली आहेत.