उपजिल्हा रुग्णालय स्थापन करा
बल्लारपूर : जिल्ह्यातील दुसरे सर्वात मोठे शहर असलेल्या बल्लारपूर येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. सद्यस्थितीत याठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे. त्यामुळे येथे अनेक असुविधांचा सामना रुग्णांना करावा लागतो. या रुग्णालयाची दर्जा वाढ झाल्या स रुग्णालयात सोयीसुविधांची उपलब्ध होईल.
जिल्ह्यात निवडणुकांचे वारे
चंद्रपूर : जिल्ह्यातील ६२९ ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. त्यामुळे या गावस्तरावर निवडणूक चर्चांंना उत आला आहे. ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने गावागावात विविध पक्षामतर्फे उमेदवार चाचपणी सुरू आहे.
राष्ट्रीयकृत बँके नसल्याने नागरिक त्रस्त
जिवती : तालुक्याचे स्थळ असलेल्या जिवती येथे एकही राष्ट्रीयकृत बँक नसल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. याठिकाणी शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालय असल्याने येथे रेलचेल मोठ्या प्रमाणात आहे. तसेच बाजारपेठही मोठी असल्याने येथे आवकही असते. त्यामुळे येथे राष्ट्रीयकृत बँकेची स्थापना करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे.
धरणांचे खोलीकरण व सौंदर्यीकरण करावे
चंद्रपुर: जिल्ह्यात अनेक मध्यम सिंचन प्रकल्प आहे. मात्र त्यात गाळ साचला असल्याने त्याची स्वच्छता करण्यात यावी तसेच या धरण परिसराचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी केली जात आहे. या धरणांचे खोलीकरण झाल्यास पाणीसाठा उपलब्ध होईल.
वर्ग एकची प्रकरणे मार्गी लावावे.
राजुरा : राजूरा उपविभागात राजुरा ,कोरपना, जिवती हे तालुके येतात. मात्र येथील अनेक जमिनी वर्ग दोनमध्ये आहे. त्यांचे वर्ग एकमध्ये रूपांतर करण्यात यावे. यासाठी शासनाने शासन स्तरावरचही प्रक्रिया राबवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कायमस्वरूपी अभियंता द्या
वनसडी : तालुक्यातील पारडी, नारडा, कवठला या तीनही वीज उपकेंद्रामध्ये कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अनुषंगाने येथे त्वरित रिक्त पदे भरून अभियंता देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिक कडून होते आहे.