असे झाल्यास बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळेल व कंपनीमुळे निर्माण झालेली बेरोजगारी संपुष्टात येईल.
म्हणून स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार व शेतमजुरांना बरांज खाणीत व्हॉल्व्हो ट्रकचे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने कंपनीशी बोलून मध्यस्ती करावी, अशी मागणी तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
यावेळी कामगार नेते व चेक बरांज ग्रा. प. चे उपसरपंच राजू डोंगे व सोबत ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास ईदनूर उपस्थित होते.