गोंडपिपरी : पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील रस्त्यावरील झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी करण्यात आली आहे. या फांद्या जीवघेण्या ठरत आहे. त्यामुळे या फांद्याची छाटणी करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात आली. विशेषत: गोंडपिपरी, मूल, जिवती तालुक्यांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फांद्या आहे.
जिल्ह्यातील शेतकरी चारा टंचाईच्या सावटात
नागभीड : यावर्षी पडलेला अत्यल्प पाऊत त्यातच दृष्काळसदृश स्थिती असल्याने जिल्ह्यातील शेतकºयांकडे मोठ्या प्रमाणात चाऱ्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे शेतकरी चाºयाच्या शोधात इतर जिल्ह्यात जात असून तिथून धान तसेच सोयाबीनच्या कुटार आणत आहे. यामध्ये मात्र त्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
जिवती मार्गावर खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
गडचांदूर : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जाताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. नागरिकांसाठी त्रासदायक ठरलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शेड नसल्याने प्रवाशांचे बेहाल
मारोडा : येथील रेल्वस्थानकावर शेड नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. उन्ह, वारा व पावसामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे येथे शेड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात
कोरपना : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने पहिल्याच मॉन्सूनच्या पावसात नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतने समस्या दूर करण्याची मागणी महिलांनी केली आहे.
शासकीय कार्यालयात शौचालयाचा अभाव
कोरपना : तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात शौचालय व्यवस्था नसल्याने कामानिमित्त जाणाºया नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालयात नेहमीच अस्वच्छता दिसून येते. याचा परिणाम नागरिक व कर्मचाऱ्यांवरही होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देवून सासकीय कार्यालयात शौचालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी
गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक रस्ते अद्यापही डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने पावसाळ्यात या रस्त्यांवरुन चालणे कठीण होत आहेत. डांबरीकरणाअभावी एसटीही अनेक गावात अद्यापही पोहचली नाही. शासनाने याकडे लक्ष देऊन गाव तिथे रस्ता तयार करावा, अशी मागणी होत आहे.
शासकीय योजनांबाबत जनजागृती करावी
घुग्घुस : शासनाकडून सामान्य नागरिकाच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. मात्र या योजनांची माहितीच अनेकांपर्यंत पोहचली नसल्याने नागरिक योजनांपासून वंचित आहे. योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आहे.
तेलवासा -भद्रावती रस्त्याची दुरवस्था
भद्रावती : भद्रावती तालुक्यातील तेलवासा ते सुमठाना हा रस्ता आयुध निर्माणी चांदा यांच्या अखत्यारित येतो. मात्र सध्या या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
कचरा पेट्यांची स्वच्छता करावी
चिमूर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चौकातील कचरा पेट्याही तुंबल्या आहेत. स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नगर परिषदतर्फे शहरात विविध ठिकाणी कचरा कुंडी बसविण्यात आल्या. परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या कचराकुंडीमध्ये कचरा टाकतात मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पेट्यांची नियमीत स्वच्छता होत नाही.
पेल्लोरा येथे रस्ता तयार करण्याची मागणी
राजुरा : निर्ली ते पेल्लोरा ही दोन गावे अद्याप रस्त्यांनी जोडली नाहीत. पावसाळ्यात नागरिकांचे हाल होतात. निर्ली येथील विद्यार्थ्यांना झाडे-झुडूपांमधून वाट काढत पेल्लोरा येथील शाळा-महाविद्यालयात जावे लागते. निर्ली व पेल्लोरा येथील शेतकºयांना शेताकडे जाण्यास मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले. मात्र, दखल घेण्यात आली नाही. हा रस्ता कढोली (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जोडला आहे. पण, पावसाळ्यात प्रचंड त्रास होतो. हडस्ती मार्गावर पुल तयार केल्यास किनबोडी व पेल्लोरा येथील नागरिकांना चंद्रपूरला जाण्यास सोयीचे होणार आहे.
आधारभूत दरानुसार तूर खरेदी सुरू
चंद्रपूर : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार तूर खरेदी सुरू झाली आहे. केंद्र शासनाने लागू केलेला ५ हजार ४५० रुपये हमीदर शेतकºयांना दिला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकºयांनी तूर विक्रीसाठी आणण्यापूर्वी बाजार समितीच्या कार्यालयात आॅनलाईन नोंदणी करावी, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
शेतीपूरक योजना गावात पोहोचविण्याची गरज
गडचांदूर : कोरपना तालुक्यातील जनता शेतीवरच अवलंबून आहे. परंतु, यंदा कमी पाऊस पडल्याने पिके वाया गेली. शेतकºयांना लागवडीचाही खर्च मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कृषी व अन्य विभागाच्या योजना गावात न आल्याने शेतकरी निराश आहेत. त्यामुळे दुग्ध व शेतीपूरक अन्य योजना आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे