युवकांचा पुढाकार : पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदनब्रह्मपुरी: शहरातील वर्षानुवर्ष रखडलेल्या समस्या आजही अडचणीच्या व धोकादायक असल्याचे निदर्शनास आणून समस्येवर तोडगा काढण्याची मागणी येथील युवकांनी केली आहे. यासंदर्भात नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना बुधवारी निवेदन देण्यात आले.ब्रह्मपुरी शहराची ओळख सर्वदूर आहे. मात्र शहरातील समस्या अद्यापही कायम आहेत. त्यामुळे नागरिकांना गैरसोईचा सामना करावा लागत आहे. नगर परिषद अस्तित्वात आली. तेव्हापासून समस्या जटील व गुंतागुंतीच्या होत गेल्या, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या समस्या तातडीने सुटाव्यात, यासाठी ब्रह्मपुरीतील युवकांनी पुढाकार घेऊन मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. बाजार चौक ते ख्रिस्तानंद चौक रोडवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, नळाला टिल्लूपंपधारकांवर कारवाई करण्यात यावी, रस्त्यावरील अवैध पार्कीग हटविण्यात यावी, यासह विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसदर्भात अभियंता बंडावार यांच्याशी युवकांनी चर्चा केली. या मागण्यांवर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन बंडावार यांनी दिले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विवेक कळंबेकर, दिलीप पंडित, गिरीश बुराडे, मोहन रांजणकर, शशांक नानोटी, राजू देऊरकर, मनीष नाकतोडे, आल्हाद शिनखेडे व इतर युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
ब्रह्मपुरीतील समस्या सोडविण्याची मागणी
By admin | Published: June 04, 2016 12:54 AM