मोकाट कुत्र्यांचा हैदोस
वरोरा : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, शहरातील कॉलरी आणि अन्य वॉर्डात मागील काही दिवसांपासून हैदोस सुरू आहे़ रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडल्यास कुत्र्यांपासून सावध राहण्याची वेळ आली़ आहे.
आधारकॉर्डविना योजनांपासून वंचित
गोंडपिपरी : तालुक्यात आधारकार्ड काढण्याची सुविधा आहे. मात्र, ग्रामीण भागात ही सुविधा नसल्याने नागरिकांची पायपीट सुरू आहे. आधार कार्ड नसल्याने शासकीय व निमशासकीय कामे ठप्प पडली आहे. याचा फटकासुद्धा अनेकांना बसत आहे. आधारकार्डशिवाय कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी उमटत आहे़
रोहयोची कामे तातडीने सुरू करावी
सिंदेवाही : शेतीची कामे आता संपत आहे. त्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नाही़. त्यामुळे रोहयोची कामे सुरू करणे गरजेचे आहे़. तालुक्यात रोजगार देणारे मोठेउद्योग नाहीत़. शेतीच्या कामावरच बहुतेक मजुरांचा प्रपंच चालतो़. मजुरांना कामाची गरज आहे़. प्रशासनाने तालुक्यात रोहयोअंतर्गत विविध कामे सुरू केल्यास मजुरांना आर्थिक आधार मिळू शकतो़.