सर्वत्र कोरोनाने कहर केला असून, नवरगावमध्येही तो वाढत आहे. आतापर्यंत शेकडो नागरिकांना त्याने कवेत घेतले. ज्यांनी शासकीय यंत्रणेमार्फत तपासणी केली, त्यांची नोंद झाली. परंतु बरेच नागरिक भीतीपोटी खासगी दवाखान्यांमध्ये उपचार करून बरे झाले. त्यांची शासन दरबारी नोंद झालेली नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या ही नवरगांव आणि परिसरातसुद्धा कमी दिसते. नवरगावमध्ये या वर्षी कोरोनाने ३० ते ४० रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये तरुण मंडळीचासुद्धा समावेश आहे.
दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे आकडे लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावात फवारणी करून कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.