चिमूर तालुक्यातील नवतळा येथून तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व नोकरदार तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करतात तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी शंकरपूर, कॅम्पा, नागपूर येथे विद्यार्थी जातात. लॉकडाऊनमुळे बसफेऱ्या बंद केल्या होत्या, तर अनलॉकनंतर महत्त्वाच्या ठिकाणच्या कमी प्रमाणात बसफेऱ्या सुरू झाल्या. परंतु, ग्रामीण भागात बसफेऱ्या सुरू झालेल्या नाहीत. ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद होत्या, परंतु शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी, विद्यार्थिनी शाळेत पायी जात आहेत, तर काही सायकलने. ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद असल्याने, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी चिमूर आगारातून ग्रामीण भागात सुटणाऱ्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी उपसरपंच महादेव कोकोडे यांनी आगारप्रमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ग्रामीण भागातील बसेस पूर्ववत सुरू झाल्यास परिवहन विभागाच्या उत्पन्नात वाढ होईल. नेरी-नागपूर-नवतळामार्गे बस सुरू झाल्यास नवतळा परिसरातील प्रवाशांची अडचण दूर होणार आहे.
230921\img-20210922-wa0251.jpg
आगार प्रमुखाला निवेदन द्वारे केली मागणी