ब्रम्हपुरीतील खत विक्रेते युरियाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करून खताचा तुटवडा निर्माण करत आहेत. परिणामी खताची किंमत तीनपट वाढवून शेतकऱ्यांच्या आगतिकतेचा फायदा काही व्यापारी घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे; तसेच युरिया पाहिजे असेल तर सोबत गोळी खत घ्या तेव्हाच युरिया मिळेल, अशा अटी काही व्यापारी ठेवत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी शिवसेनेकडे येताच उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख मिलिंद भणारे, तालुका प्रमुख नरू नरड, शहर प्रमुख किशोर चौधरी, उपतालुका प्रमुख पराग माटे, माजी शहर प्रमुख शामा भानारकर आदी उपस्थित होते. न्याय न मिळाल्यास शिवसेना येत्या दोन दिवसात तहसील कार्यालयासमोर आंदोलन करेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
260821\img-20210826-wa0055.jpg
एस. डी. ओ. डोंबे यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी