लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काळ बदलत गेला, तसा लोकांच्या खानपान आणि चवीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाला. पूर्वी शहरवासियांना गरिबांच्या घरचा गुळाचा चहा नकोसा वाटत होता. आता गुळाच्या चहाचे घोट आवडीने घेणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. चंद्रपुरातील अनेक भागात ‘स्पेशल गुळाची चहा’ विकणारे दुकाने लागले आहेत. तर नागरिकही मोठ्या आवडीने गुळाची चहा पित आहेत.एकमेकांच्या गाठीभेटी झाल्यानंतर दोघांतील बोलण्याला जास्ते वेळ मिळवून देणारे चहा हे पेय प्रत्येक कुटुंबातील अविभाज्य घटक बनले आहे. एक कप चहा अनेक कामे करून जातो.मात्र, अतिचहामुळे त्यांचे दुष्परिणामही भोगावे लागतात.कोणत्याही कानाकोपºयात चहा सहजपणे आणि प्रत्येकाला परवडणाºया दरात मिळतो. परंतु साखरेची चहा अतिसेवनाने शरीरात शरीरात उष्णताा वाढणे, मधुमेह, आम्लपित्त आणि त्यामुळे सुरू होणारी डोकेदुखी असे अनेक दुष्परिणामही जाणवतात.परंतु, गुळाचा चहा पिल्याने आरोग्यावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही, असे चहा विक्रेते आणि पिणाऱ्यांचे मत आहे. यामुळे शहरातील गुळाच्या चहाला जादा मागणी असल्याचे चंद्रपूर येथील जयंत टॉकीज समोरील चहा विक्रेते गोविंद (गोपी) मित्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.रोज लागतो दोन किलो गुळचंद्रपूर येथील जयंत टॉकीज समोर गोपी मिश्रा यांच्या दुकानात साध्या चहासोबत गुळ चहा सुरु केला. सुरुवातीला अल्प प्रतिसाद होता. मात्र आता चहा पिणाºयांची संख्या वाढत आहे. त्यांना दररोज दीड ते दोन किलो गुड लागतो. दिवसभारात दिडशेच्या जवळपास ग्राहक गुळाची चहा पिऊन समाधान व्यक्त करतात. त्यामुळे आनंद होते असे मित्रा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.हर्बल चायवातावरणातील बदलामुळे नागरिकांना सर्दी, खोकला असे आजार जडत असतात. त्यासाठी हर्बल चहासुद्धा मिश्रा यांच्या दुकानात मिळतो. हर्बल चहामध्ये लवंग, सुंड, ईलायची, कलमी आदी साहीत्य वापरुन हर्बल चहा बनविला जातो. अनेकजण सर्दीसाठी हा चाय पित असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढतेयपूर्वी केवळ साखरेच्या चहाची मागणी होती. मात्र एक दोन ग्राहकांनी गुळाच्या चहाबाबत दुकानामध्ये चर्चा केली. तेव्हापासून गुडाची चहा विक्री सुरु केली. पूर्वी त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. मात्र आता दररोज गुळाच्या चाय पिणाºयांची संख्या वाढत असल्याचे गोपी मित्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चंद्रपुरात वाढतेय गुळाच्या चहाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 12:26 AM
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : काळ बदलत गेला, तसा लोकांच्या खानपान आणि चवीमध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाला. पूर्वी शहरवासियांना ...
ठळक मुद्देसंडे अँकर । आरोग्यासह लाभ, नागरिकांमध्ये मोठी लोकप्रियता, शहरात अनेक ठिकाणी लागले ठेले