लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा खासदार अशोक नेते यांनी सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे २१ जानेवारीला पार पडलेल्या एका कार्यक्रमात ‘माना जमातीला मिळालेल्या आरक्षणाचा विरोध’ केल्याचे वृत्त समाज माध्यमातून प्रसिद्ध झाले. या वक्तव्याचा माना जमातीच्या वतीने निषेध केला असून मंगळवारी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले. जाहीर माफी मागितली नाही तर पोलिसात तक्रार करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.नालुनंगपेन मुठवा कोलासूर पेनठाना ट्रस्ट गडबोरी येथे राष्ट्रीय गोंडवाना महासंमेलन व संस्कृती महोत्सव घेण्यात आले. यावेळी खासदार नेते यांनी उद्घाटनपर भाषणात माना जमातीच्या संविधानिक आरक्षणाला विरोध केला. दरम्यान, यासंदर्भात समाज माध्यमातून सदर वक्तव्य पसरताच माना समाज संघटनेने निषेध केला.दुपारी २ वाजता हुतात्मा स्मारकापासून निषेध रॅली काढण्यात आली. संविधानाची शपथ घेऊन संसदेत जाणाऱ्या खासदारांनी सर्वोच्च न्यायालयाने बहाल केलेल्या अधिकारांविरूद्ध बोलणे अन्यायकारक असल्याचा आरोप माना समाजाने केला. २ फेब्रुवारीपर्यंत जाहीर माफी मागावी अन्यथा पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशाराही संघटनेने दिला. उपविभागीय अधिकाºयांना निवेदन देताना पंचायत समीती उपसभापती शांताराम सेलवटकर, राहुल दडमल, अमोल झाडे, देवराव नन्नावरे, कुलदीप श्रीरामे, अरविंद सांदेकर, निकेश श्रीरामे, रामदास चौधरी, सुखदेव ढोणे व संदीप खडसंग उपस्थित होते.नागभीडमध्येही निषेधनागभीड : माना समाजाच्या आरक्षणाला विरोध केल्याने माना समाजाच्या वतीने बुधवारी निषेध करण्यात आला. खासदार अशोक नेते यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी येथील राममंदिर चौकात नागभीड तालुक्यातून माना समाजातील अनेक युवक युवती व नागरिक एकत्र आले. तहसीलदार समीर माने यांना निवेदन देण्यात आले. जि. प. सदस्य गोपाल दडमल, शंकरराव दडमल, बाबुराव बारेकर, संदीप खडसंग, विलास श्रीरामे, मंगेश रंधये, निरंजन गजभे, विरू गजभे, सतीश जीवतोडे, वनिता गरमळे उपस्थित होते.शंकरपूर येथेही निषेधशंकरपूर: गडचिरोली-चिमूरचे भाजपाचे खासदार अशोक नेते सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे माना जमातीला मिळालेल्या आरक्षणाचा कार्यक्रमाच्या मंचावरुन विरोध केल्याचे प्रसिद्धी माध्यमात आले. त्यामुळे आदिवासी माना जमातीमध्ये तीव् असंतोष पसरला आहे. त्यामुळे खासदार अशोक नेते यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यांच्या निषेर्धात माना जमात शंकरपूर ग्रामस्थानी जाहीर निषेध केला. याप्रसंगी उपस्थित अरविंद सांदेकर, कुलदिप श्रीरामे, निकेश श्रीरामे, अमोल नागोसे, हरी घोडमारे, संजय नन्नावरे, रणजित सावसाकडे, विजय घोडमारे, राहुल ढोक, बाळ ढोक, अनिल नन्नावरे,भगवान सावसाकडे व शेकडो माना जमातीच्या उपथित भाजपा नेते खासदार अशोक नेते यांचा निषेध करण्यात आले.
एसडीओ कार्यालयासमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:02 PM
चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा खासदार अशोक नेते यांनी सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी येथे २१ जानेवारीला पार पडलेल्या एका कार्यक्रमात ‘माना जमातीला मिळालेल्या आरक्षणाचा विरोध’ केल्याचे वृत्त समाज माध्यमातून प्रसिद्ध झाले. या वक्तव्याचा माना जमातीच्या वतीने निषेध केला असून मंगळवारी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले.
ठळक मुद्देअशोक नेते यांच्या वक्तव्याचा निषेध : माना समाज संघटनेने दिले निवेदन