शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

कोरोनाच्या संकटात १२८ व्यक्तींना ‘डेंग्यू’चा डंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 5:00 AM

डेंग्यू हा डासापासून पसरणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे. त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो. डेंग्यू ताप (डीएफ) आणि डेंग्यू रक्तस्त्रावी ताप (डीएचएफ) हा डेंग्यू विषाणू १, २, ३ व ४ पासून होतो. या दोनही तापात सर्वसाधारण गुणधर्म सारखेच असतात. हा आजार कोणाही व्यक्तीला होवू शकतो, मात्र प्रामुख्याने लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो.

ठळक मुद्देसर्वेक्षणासाठी अपुरे मनुष्यबळ : चंद्रपूर मनपा क्षेत्रातही आढळले २४ रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे नागरिकांमध्ये आरोग्यबाबत जागृती वाढली. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सातत्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात आहे. मात्र, कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात १२८ व्यक्तींना डेंग्यू झाल्याचे पुढे आले. यामध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २४ रूग्णांचाही समावेश आहे.डेंग्यू हा डासापासून पसरणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे. त्याचा प्रसार एडीस ईजिप्टाय डासांमार्फत होतो. डेंग्यू ताप (डीएफ) आणि डेंग्यू रक्तस्त्रावी ताप (डीएचएफ) हा डेंग्यू विषाणू १, २, ३ व ४ पासून होतो. या दोनही तापात सर्वसाधारण गुणधर्म सारखेच असतात. हा आजार कोणाही व्यक्तीला होवू शकतो, मात्र प्रामुख्याने लहान मुलांना डेंग्यू संसर्गाचा धोका अधिक असतो. अनियंत्रित लोकसंख्या वाढ, अनियोजित व अनियंत्रित शहरीकरण, कचऱ्याचे अपुरे व अयोग्य व्यवस्थापन, पाणीपुरवठ्याचे सदोष व्यवस्थापन, पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि अनियमित पाणीपुरवठा, ग्रामीण, आदिवासी भागातील पर्यावरणातील मानवी हस्तक्षेप व जीवनशैलीतील बदलांंमुळे या आजाराची बाधा होते. मानवातील संसर्ग हा विषाणू बाधित ‘एडिस ईजिप्टाय’ डास चावल्यामुळे होतो. हा डास दिवसा चावतो. या तापाचा प्रसार मानव-डास-मानव अशा क्रमाने असतो. या डासांची उत्पत्ती घर व परिसरातील भांडी, टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते. विषाणू बाधित डासाने चावा घेतल्यानंतर लक्षणे ५ ते ६ दिवसांच्या काळात दिसून येतात, अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली.अशी घ्यावी खबरदारीलक्षणे आढळल्यास रूग्णाने विश्रांती घ्यावी, रूग्णाचे तापमान ३९ डिग्री सेल्सिअसच्या खाली राहण्यासाठी डॉक्टरांना दाखवावे. उलटी, जुलाब, मळमळ व घाम आल्यास शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी घरी बनविलेल्या फळांचा रस व ओआरएस द्रावण द्यावे. शरीरात जास्त प्रमाणात पातळ द्रव जातील याची काळजी घ्यावी.गोंडपिपरीत सर्वाधिक रूग्णगोंडपिपरी व राजुरा तालुक्यात डेंग्यू आजाराचे सर्वाधिक रूग्ण आढळले. आरोग्य विभागाच्या तपासणीनुसार गोंडपिपरी २४ आणि राजुरा तालुक्यात आतापर्यंत १५ रूग्ण आढळल्याची नोंद आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी सुरू असल्याने रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता पुन्हा वाढू शकते.डेंग्यूची सामान्य लक्षणेडेंग्यूची लक्षणे इतर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधे व डोळे दुखतात. भूक मंदावणे, मळमळणे व पोट दुखते. रक्तस्त्रावीत डेंग्यू ताप हा डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरूवात तीव्र तापाने होते. काही दिवसात याची लक्षणे साध्या डेंग्यू तापासारखी असतात. क्वचित त्वचेवर पुरळ दिसून येतात. रक्तस्त्रावित डेंग्यू तापाचे निदान हातपाय, चेहरा व मानावर आलेल्या पुरळांवरून केली जाते.तापाचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाता तात्काळ रूग्णालयात जावे. आरोग्य प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वेक्षण व रूग्ण तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, रूग्णांना औषधोपचार सुरू असताना त्यांचे जेवण व पाणी सेवनाकडे कुटुंबाने विशेष खबरदारी घेतली पाहिजे.- डॉ. अनिल कुकुडपवार,जिल्हा हिवताप अधिकारी, चंद्रपूरआठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी. भांड्यांना योग्य पद्धतीने झाकून लावावे. घराभोवतालची जागा स्वच्छ व कोरडी ठेवावी. घर व छतावर वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ठेऊ नये. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस न चुकता पूर्ण करावा.- डॉ. आविष्कार खंडारे, वैद्यकीय अधिकारी, मनपा चंद्रपूर

टॅग्स :dengueडेंग्यू