बॉक्स
आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त
सफरचंद आरोग्यासाठी उत्तम फळ समजले जाते. त्यामुळे बाराही महिने सफरचंदाची मागणी असते. श्रावण मास असल्याने उपवासासाठी मागणी वाढली आहे. तसेच विविध रुग्णही आजारात सफरचंद खातात त्यामुळे सफरचंदाची मागणी वाढली आहे. १२० ते १५० रुपये किलो दराने सफरचंदाची विक्री केली जात आहे.
बॉक्स
डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
डेंग्यूच्या रुग्णाच्या पांढऱ्या पेशी कमी होत असतात. या पेशीची संख्या वाढविण्यासाठी अनेक डॉक्टर रुग्णांना ड्रॅंगन फ्रूट खाण्याचा सल्ला देतात. यामुळे पांढऱ्या पेशी लवकर वाढत असतात. रुग्णांसोबत सर्वसामान्य ग्राहकी ड्रॅगन फ्रूट नेहमी खात असतात.
कोट
श्रावण मास सुरू झाल्याने फळांची मागणी पूर्वीच्या तुलनेत वाढली आहे. ग्रामीण भागात ड्रॅगन फ्रूटची मागणी कमी आहे. ग्राहकांनी मागणी केली तर त्याला ड्रॅगन फ्रूट उपलब्ध करून दिला जातो. सद्यस्थितीत १०० रुपये एक नग या दराने ड्रॅगन फ्रूटची विक्री सुरू आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत सफरचंदाची भाव वाढले आहेत.
आदित्य रामटेके फळ विक्रेता
-----
ड्रॅगन फ्रुट १०० (रुपये नग)
किवी १०० (रुपये ३ नग)
सफरचंद १५० रुपये किलो
संत्रा १५० रुपये किलो
मोसंबी ६० रुपये किलो
चिकू ८० रुपये किलो
पपई ६० रुपये किलो
आलुबुखार १५०