भद्रावती : तालुक्यातील देऊरवाडा येथे अनेक धार्मिक ठिकाण आहेत. त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन येथील पायाभूत विकास घडवून आणावा, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सुविधा पुरविण्यात आल्यास येथील पर्यटन विकास साधला जाईल.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शकांचा अभाव
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमा दरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. सदर महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा महामार्गांपैकी एक आहे. त्यामुळे मोठी वर्दळ असते.
धूळ प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
माजरी : कोळसा उद्योगामुळे माजरी शहर सर्वदूर परिचित आहे. मात्र या कोळसा खाणीच्या होणाऱ्या वाहतुकीमुळे शहरात धूळ प्रदूषण वाढले आहे. बऱ्याच वाहनावर ताडपत्री झाकून राहत नसल्याने कोळसा रस्त्यावर पडत असून धूळ निघत आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक बेजार
जिवती : तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गम भागात असलेल्या गावातील रस्त्यावरून जाणे तर जिकरीचे झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत
मूल : तालुक्यात बुरड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.