वास्तविक, लिलाव झालेल्या घाटांवर रेती उत्खनन करण्याची मुदत ही १० जून होती. याचाच अर्थ त्यानंतर कोणत्याही घाटांवरून रेतीचा उपसा करता येत नाही. असे असताना मूल तालुक्यातील उश्राळा, चितेगाव, भेजगाव या घाटांवरून जेसीबीच्या माध्यमातून अवैधरीत्या रेतीचा उपसा करून साठवणूक केली जात आहे. याकडे युवा क्रांती संघटनेचे निखिल वाढई, प्रणीत पाल, आकाश येसनकर, सूरज गेडाम, निहाल गेडाम यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांचे सचित्र लक्ष वेधले आहे. याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी ही तक्रार तहसीलदारांकडे कार्यवाहीसाठी पाठविणार असल्याचे सांगितले.
खनिकर्म विभाग म्हणतो, ती रेती वैधच
याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम म्हणाले, १० जूनपर्यंत लिलाव झालेल्या घाटांतून रेतीचा उपसा करायचा होता. यानुसार उपसा केलेल्या रेतीचा काहींनी साठा करून ठेवला आहे. या साठ्याची ३० सप्टेंबरपर्यंत विक्री करायची आहे. जर पुढील दहा दिवस म्हणजेच १० ऑक्टोबरपर्यंत हा साठा तेथून हटविला नाही तर तो साठा जप्त केला जाईल.
250921\img-20210924-wa0011.jpg
हाच तो रेतीसाठा. अधिकारी म्हणतात वैध, तर तक्रार झाली अवैध असल्याची