शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

प्राचीन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:52 PM

चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचिन वास्तू शहरात आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. प्राचिन विहिरी हा तसाच एक अनमोल ठेवा. मात्र सध्या या प्राचिन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण साचली आहे.

ठळक मुद्देचिंतेची बाब : चंद्रपूर स्वच्छ होतेय; जलस्रोत केव्हा होणार?

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक प्राचिन वास्तू शहरात आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत. प्राचिन विहिरी हा तसाच एक अनमोल ठेवा. मात्र सध्या या प्राचिन विहिरींमध्ये उदासीनतेची घाण साचली आहे. एकीकडे चंद्रपूर स्वच्छ करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे जलस्रोत कचऱ्याने बरबटले ठेवणे, ही बाब चंद्रपूरच्या सुदृढ आरोग्याबाबत चिंता निर्माण करणारी ठरत आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या सध्या झपाट्याने वाढत आहे. जवळजवळ साडेचार लाखांचा आकडा लोकसंख्येने पार केला आहे. हा आलेख आणखी वाढतच जाणार आहे. असे असताना चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी सध्या एकमेव इरई धरण हेच जलस्रोत उपलब्ध आहे. यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला.त्यामुळे चंद्रपूरला पाणी पुरवठा करणारे हे एकमेव जलस्रोतही सध्या अखेरची घटका मोजत आहे. या धरणात केवळ ३९ टक्के पाणी असल्याने यंदाचा उन्हाळा चंद्रपूरकरांच्या तोंडचे पाणी पळविणारा ठरणार आहे.सध्या मनपा प्रशासन चंद्रपूरकरांची तहान भागवू शकणाºया दुसऱ्या जलस्रोताच्या शोधात आहे. मात्र जे जलस्रोत प्राचिन काळापासून अस्तित्वात आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गोंडराजाच्या राजवटीत चंद्रपुरात अनेक मोठमोठ्या विहिरी बांधल्या आहेत. ब्रिटीश सरकारनेही काही विहिरी बांधल्या. त्या आजही आपल्या पोटात बाराही महिने पाणी साठवून अस्तित्वात आहेत.महाकाली मंदिरामागे दोन विहिरी, नगिनाबाग येथील सवारी बंगाल्याजवळ एक विहीर, जटपुरा गेट हनुमान मंदिराजवळ एक विहीर, यासोबतच अंचलेश्वर मंदिर, जिल्हा कारागृह, भिवापूर येथील बंगाली कॅम्प या परिसरातही मोठमोठ्या प्राचीन विहिरी आहेत. तब्बल १५ ते १७ एमएलडी पाणी या विहिरींमधून चंद्रपूरकरांना मिळू शकते. मात्र या विहिरींकडे मनपा प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या विहिरी पाण्यासोबत मनपाच्या उदासीनतेची घाणही आपल्या पोटात बाळगून आहे.सध्या महानगरपालिकेकडून स्वच्छता अभियान धडाक्यात राबविणे सुरू आहे. शहर स्वच्छतेसाठी एकावर एक पावले उचलली जात आहे. मनपाच्या या प्रयत्नांचे फलितही दृष्टीस पडत आहे, यात शंका नाही. मात्र शहर स्वच्छ करताना जलस्रोत तसेच उपेक्षित आणि घाणीने बरबटलेले ठेवणे योग्य नाही. मनपाच्या या कृत्यामुळे मनपाचेच स्वच्छता अभियान डागाळले जात आहे.शेकडो विहिरी बंदआगामी उन्हाळा चंद्रपूरकरांसाठी भिषण पाणी टंचाईचा जाणार आहे. चंद्रपूर मनपाच्या हद्दीत सुमारे सव्वा पाचशे विहिरी आहेत. यातील केवळ १३२ विहिरीच सुरू असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्यातीलही ८० हून अधिक विहिरींचे पाणी दूषित असल्याची माहिती आहे. शहरातील प्राचिन विहिरींसोबतच इतर विहिरींमधील गाळ उपसून स्वच्छ केल्या तर पाण्याची पातळी वाढून त्याचा लाभ निश्चितच चंद्रपूरकरांना मिळणार आहे.सामाजिक संस्थांच्याही पुढाकाराची गरजचंद्रपुरातील या प्राचिन विहिरींना स्वच्छ करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. शहराची वाढती लोकसंख्या आणि जलस्रोत बघता मनपा प्रशासनाला हे प्राचिन जलस्रोत स्वच्छ आणि अबाधित ठेवावेच लागणार आहे. इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी व त्यांच्या चमूने सलग शेकडो दिवस श्रमदान करून चंद्रपुरातील प्राचिन वास्तू व परकोट स्वच्छ केला. या प्राचिन जलस्रोतांच्याही स्वच्छतेसाठी शहरातील सामाजिक संस्थांनी असाच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा आंदोलनसंजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे राजेश बेले यांनी या प्राचिन विहिरींची पाहणी केल्यानंतर तेही अस्वस्थ झाले. शहराच्या पोटात असलेले हे प्राचिन जलस्रोत असे दूषित होत असल्याने त्यांनी ‘लोकमत’जवळ चिंता व्यक्त केली. मनपाने या विहिरींना स्वच्छ करून नवसंजीवनी द्यावी, अन्यथा संजीवनी संस्था या विरोधात आंदोलन छेडेल, असा इशारा राजेश बेले यांनी दिला. यानंतरही मनपाने दखल घेतली नाही तर पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.