चंद्रपूर: गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल देण्यात येणारे राष्ट्रपती पदक चंद्रपूर येथे पोलिस उपाधीक्षक (गृह) पदावर कार्यरत असणाऱ्या राधिका फडके यांना गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आला आहे. चंद्रपूर येथे 26 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राधिका फडके या पुणे येथे पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असताना अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये दाखल झालेल्या गुन्ह्यात एका महिला आरोपीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम 1999 च्या कलमानव्ये मोकाची भारतातील पहिली कारवाई केली होती. यासोबत त्यांनी आजपर्यंत केलेल्या प्रामाणिक सेवेची तसेच गुणवत्तापूर्ण कामगिरीची दखल घेऊन त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली आहे.