आगामी स्थायी समितीच्या सभापती पदासाठी सूचवलेल्या तीन नावांची शिफारस करण्यास गटनेते वसंत देशमुख यांनी नकार दिला होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांना गटनेतेपदावरूनच हटविण्याचा निर्णय घेतला. त्यांची पदावरून गच्छंती करण्यासाठी भाजप व मित्रपक्षाच्या ३३ नगरसेवकांची २८ ऑगस्ट २०२१ रोजी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या नागपूर कार्यालयात ओळख परेड घेण्यात आली. मनपामध्ये भाजप व मित्र पक्षाचे ४० नगरसेवक आहेत. २७ एप्रिल २०१७ रोजी गट तयार करण्यात आला. देशमुख यांना भाजने स्थायी समिती सभापतीपदाचे आश्वासन दिले होते. परंतु, सभापतीपदी रवी आसवानी यांची वर्णी लागली. तेव्हापासून गेटनेते देशमुख अस्वस्थ होते. आठ सदस्यांच्या निवृत्तीनंतर त्या जागेवर तीन नगरसेवकांची नावे पाठविण्यास भाजप नेत्यांनी सांगितले होते. देशमुख यांनी विरोध केला. तिथून कलह वाढतच गेला. देशमुख यांचा विरोधी पावित्रा बघून त्यांनाच गटनेते पदावरून गच्छंती करण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या. विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या कार्यालयात ३६ नगरसेवकांच्या स्वाक्षरीसह अर्ज करण्यात आला. मात्र, ओळख परेडदरम्यान ३ नगरसेवक गैरहजर होते. ३३ नगरसेवकांनी जयश्री जुमडे यांना पाठिंबा दिल्याने त्यांची बहुुमताने गटनेतेपदी निवड झाल्याची अधिसूचना विभागीय आयुक्तांनी मंगळवारी जारी केली आहे.
देशमुखांना स्थायी सभापतीचे डोहाळे भोवले; मनपा गटनेतेपदी जयश्री जुमडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:33 AM