शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

नियतीने सर्वकाही हिरावले, शासनाची मदतही अपुरी

By admin | Published: July 18, 2016 1:51 AM

हातावर आणून पानावर खाणे, अशी आर्थिक परिस्थिती. मिळेल ते काम करून मेहनतीने पै-पै करून पैसा जोडला.

आगीत घर जळाले : रामदीन यांनी मांडली 'लोकमत'समोर व्यथा वतन लोणे घोडपेठ हातावर आणून पानावर खाणे, अशी आर्थिक परिस्थिती. मिळेल ते काम करून मेहनतीने पै-पै करून पैसा जोडला. राहण्यासाठी निवारा उभा केला. आवश्यक वस्तू घरात आणल्या. गरिबीचे असले तरी एक-एक दिवस समाधानाचे जात होते. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच दडले होते. दोन महिन्यांपूर्वी २२ मे रोजी भर दुपारी रणरणत्या उन्हात अचानक आग लागली. प्रचंड तापमान आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीचा जोर वाढतच गेला. काही कळायच्या आतच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. रामदीन यादव, पत्नी मनोरमा व नातू अनिकेत कसेबसे जीव वाचवून घराबाहेर पडले. लोकांनी आग विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. आगीने रौद्ररूप धारण केले होते. राहते घर, अन्नधान्य, चीजवस्तू, कागदपत्रे आगीत भस्मसात होताना उघड्या डोळ्यांनी हतबल होऊन पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. एका क्षणात सारे काही संपले होते. मेहनतीने उभ्या केलेल्या ४० वर्षांंच्या संसाराची राखरांगोळी झाली. अंगावरचे कपडे तेवढे उरले. ताडाळी येथील रेल्वे स्टेशन परिसरात (उमरी रीठ) राहणारे रामदीन यादव आणि त्यांचे कुटुंब या दु:खातून अजूनही सावरले नाही. आग विझवताना रामदीन यांची पाठ पोळली गेली. तो घाव अजूनही दुरूस्त झाला नाही. त्यामुळे त्यांच्या हाताला काम नाही. आगीने सर्वस्व हिरावल्यामुळे जवळ पैसाही नाही. परिणामी जगायचे कसे, या विवंचनेत रामदीन आणि त्यांचे कुटुंबीय एक-एक दिवस काढत आहेत. ताडाळी ग्रामपंचायतीने घटनेच्या दिवशी पाच हजारांची मदत केली. तसेच तहसिल कार्यालयाकडून ६ हजार ७५० रूपयांचा मदतीचा धनादेश मिळाला. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे अंदाजे चार लाख रूपयांचे नुकसान झाले. तसेच वाढत्या महागाईच्या काळात ही मदत खुपच तोकडी असून या मदतीतून स्वत:वर उपचार करावे, की घरखर्च भागवावा, या विवंचनेत रामदीन सापडले आहेत. त्यामुळे शासनाने उचित मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, बीपीएल यादीत नाव असूनही घरासाठी जमीन नावावर नाही. त्यामुळे आतापर्यंत घरकूल योजनेचा लाभ मिळू शकला नसल्याची खंतही रामदीन यांनी 'लोकमत' कडे व्यक्त केली.