चंदपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये निराधार नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहेत. दरम्यान, संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांतील लाभार्थ्यांना शासनाकडून विशेष सहाय्य योजनेतील निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जात आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत २ लाख ४१ हजार ५१२ विविध योजनांचे लाभार्थी असून, त्यांना यामुळे काही प्रमाणात का होईना आधार मिळाला आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाने दहशत माजविली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोनाने तोंड वर काढल्यामुळे राज्य शासनाने प्रथम संचारबंंदी केली. त्यानंतर लाॅकडाऊन केले. यामुळे सर्व व्यवसाय ठप्प पडले आहेत. परिणामी गरिबांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान, निराधारांचे यामध्ये नुकसान होऊ नये, त्यांना आधार मिळावा, यासाठी शासनाकडून विशेष सहाय्य योजनेतील एप्रिल व मे या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. त्यानुसार प्रशासनाने तालुकानिहाय यादीनुसार लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केले आहे.
सध्याच्या कठीण काळामध्ये निराधार कुटुंबीयांना लाभ मिळत असल्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले असून, औषधोपचार तसेच अन्य कामासाठी या निधीतून खर्च भागविता येईल, असे मत निराधारांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, शासनाने निराधार योजनेचे अनुदान वाढवून किमान पाच हजार रुपये करावे, अशी मागणीही निराधारांनी केली आहे.
बाॅक्स
लाभार्थी
संजय गांधी निराधार योजना
५१३८८२
श्रावण बाळ योजना
१३०५९२
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना
५३३७८
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
४९९५
इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्तीवेतन योजना
११६५
--कोट
शासनाकडून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण करण्यासाठी निधी प्राप्त झाला आहे. एप्रिल व मे या दोन महिन्याचे अर्थसहाय्य एकत्रितपणे लाभार्थ्यांना वितरित केले जात आहे.
- डाॅ. कांचन जगताप
तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
--बाॅक्स
श्रावण बाळ योजनेचे सर्वाधिक लाभार्थी
जिल्ह्यात श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे तब्बल ९२ हजार ७८३, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसूचित जमाती २० हजार ३३७, श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना अनुसूचित जाती १७ हजार ४७२ लाभार्थी आहेत. त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे ५३३७८ तसेच अन्य योजनेच्या लाभार्थ्यांनाही लाभ दिला जात आहे.