या चौकाला सात रस्ते येऊन मिळतात. एक रस्ता वाढोणाकडे, दुसरा बौद्धविहाराकडे, तिसरा मेनरोड बाजार चौकाकडे, चाैथा भट्टी चौकाकडे, पाचवा खडके यांच्या घरांकडे, सहावा बसस्थानक व विठ्ठल-रुखमाई मंदिराकडे व सातवा महात्मा गांधी विद्यालयाकडे जातो. अशी सात रस्त्यांची ओळख असलेला चौक इतर शहरांच्या तुलनेत दुर्मीळ असावा, असे म्हणायला हरकत नाही. १५ वर्षांपूर्वी या चौकात ग्रा.पं.ची इमारत होती. त्यावेळेस सर्व शाळांचे विद्यार्थी ध्वजारोहणासाठी १५ ऑगस्ट व २६ जानेवारीला येथेच जमा व्हायचे. नवीन ग्रा.पं.ची इमारत झाल्यानंतर ग्रा.पं.ची जागा बदलली, परंतु चौकाचे महत्त्व कमी झालेले नाही. भिसीतील हा महत्त्वाचा चौक असूनही ग्रा.पं.ने चौकाच्या सुधारणेकडे व सौंदर्यीकरणाकडे कधीही लक्ष दिले नाही. या चौकाचा तत्काळ विकास करावा, अशी मागणी भिसीवासीयांनी केली आहे.
भिसीतील जुन्या चौकाचा विकास करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:30 AM