आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने जिल्ह्याशी संबंधित तीन विषयांबाबत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्टसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यातून जिल्ह्यातील ६५ गावांचा विकास होणार आहेत.जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांमधील गाळ काढण्यासाठी टाटा सेंटर आॅफ डेव्हलपमेंट, शिकागो विद्यापीठसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून ३० कोटी रुपये निधी उपलब्ध होणार आहे. राज्य शासन आणि कार्पोरेट क्षेत्राच्या एकत्रित सहभागातून गावांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हयातील मूल, पोंभुर्णा, जीवती, चिमूर, नागभीड, ब्रम्हपुरी या तालुक्यांमधील ६५ आदर्श गावांचा विकास करण्यात येणार असून हा प्रकल्प टाटा ट्रस्टच्या सहाय्याने राबविण्यात येणार आहे. या विषयांबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टाटा ट्रस्टसोबत बैठकी घेऊन पाठपुरावा केला आहे.वृद्धांसाठी विशेष प्रकल्पवृद्धांसाठी एल्डरली हेल्थ केअर प्रोजेक्ट मूल तालुक्यात राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुढील काळात संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. मूल तालुक्यात पायलट प्रकल्प म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नॅशनल हेल्थ मिशन आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून मूल तालुक्यातील २५ हजार वृध्दांना यांचा लाभ होणार आहे.
६५ गावांचा होणार विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:50 PM
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने जिल्ह्याशी संबंधित तीन विषयांबाबत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत टाटा ट्रस्टसोबत सामंजस्य करार करण्यात आले.
ठळक मुद्देटाटा ट्रस्टचे सहकार्य : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार