आॅनलाईन लोकमतचिमूर : गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यतिथी कार्यक्रम करीत असून मोठया प्रमाणात गुरुदेवभक्त येत आहेत. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घरोघरी पोहचविण्यासाठी कार्य करणे गरजेचे असल्याचे सांगत प्रत्येक गावात, समाजात गुरुदेवांचे विचार नेण्याचे काम करायचे आहे. तपोभूमीचा विकास हा वृंदावनाप्रमाणे करणार असल्याचे प्रतिपादन आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी केले.गोदेडा गुंफा यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मितेश भांगडिया, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष कृष्णा सहारे, प्रकाशपंत वाघ महाराज, भाजप तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, चिमूर सहकारी भात गिरणीचे मुख्य प्रशासक डॉ. श्याम हटवदे, विवेक कापसे, भाजप अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष जुनेदखान, गणपत खोबरे, कलीम शेख, जि.प. सदस्य गजानन बुटके, ममता डुकरे, घनश्याम डुकरे, डॉ. दीपक यावले, संजय कुंभारे, नीलम राचलवार आदी उपस्थित होते. यावेळी आ. मितेश भांगडिया म्हणाले, गुरुदेवांच्या ग्रामगीतेवर समाज, देश चालत आहे. वर्ग ५ ते ७ मधील अभ्यासक्रमात ग्रामगीता समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न चालू असून जिल्हा परिषदेने तसा ठराव घ्यावा, असेही ते म्हणाले.यावेळी विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले. यात्रेच्या दिवशी रक्तदान शिबिरामध्ये अनेक गुरुदेवभक्तांनी रक्तदान केले.पुढील समिती गठितयावेळी ईश्वर चिठ्ठीने पुढील उत्सव समिती गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष विठ्ठल सावरकर, उपाध्यक्ष विलास चौधरी, कोषाध्यक्ष नितीन गुरनुले, सदस्य रामदास जांभुळे, कृष्णा जाधव, कविता शेंडे, श्रीराम मेश्राम ,बालाजी जांभुळे, उषा गुरनुले, किशोर डांगे, रेवनदास कामडी यांची निवड करण्यात आली.
तपोभूमी गोंदेडाचा विकास वृंदावनाप्रमाणे करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 11:42 PM
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यतिथी कार्यक्रम करीत असून मोठया प्रमाणात गुरुदेवभक्त येत आहेत.
ठळक मुद्देकीर्तीकुमार भांगडिया : यात्रेत उसळला जनसागर