लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : येथील आठवडी बाजारासाठी सुयोग्य जागा व इतर विकास कामे त्वरित पूर्ण करा, असे निर्देश आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी मुख्याधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना दिले.चिमूर येथील विविध प्रलंबित विकास कामांच्या प्रश्नांबाबत शुक्रवारी आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनात न. प. मुख्यधिकारी मनोजकुमार शाह, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता टिकले आणि इतर अधिकाºयांसोबत बैठक झाली. यावेळी आ. भांगडिया यांनी सर्व अधिकाºयांशी चर्चा करून विविध विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.चिमूर येथील किल्ल्याचे सौंदर्यीकरण, आठवडी बाजाराची कुंपण भिंत, बाजारातील ओटे तयार करणे, विजेची व्यवस्था, बाजाराचे प्रवेशद्वार आणि व्यायाम शाळेचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी गोंदेडा येथील भक्तनिवास, सभागृह, ध्यान केंद्र इत्यादींचे बांधकाम २ जानेवारीला आयोजित होणाºया यात्रेपूर्वी पूर्ण करण्याचा सूचनाही आ. भांगडिया यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना दिल्या. त्याचप्रमाणे चिमूरच्या आसपासची मंजूर रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावी, असे सांगितले. यावेळी तालुका अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉ श्याम हटवदे, वसंत वारजूकर, नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, नगरसेवक संजय खाटीक, सतीश जाधव, तुषार शिंदे, तुषार काळे, उषा हिवरकर, भारती गोडे, नितीन कटारे, नन्नावरे, छायाताई कांचलवार आदी उपस्थित होते.
चिमुरातील विकास कामे मार्गी लावा : भांगडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:07 AM
येथील आठवडी बाजारासाठी सुयोग्य जागा व इतर विकास कामे त्वरित पूर्ण करा, असे निर्देश आ. कीर्तीकुमार भांगडिया यांनी मुख्याधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना दिले.
ठळक मुद्देआठवडी बाजारासाठी सुयोग्य जागा व इतर विकास कामे त्वरित पूर्ण करा...