मागण्यांची पूर्तता करावी : ४ महिन्यांचे वेतन थकीतचंद्रपूर : नगरपरिषद व महानगरपलिका येथील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्याच्या पूर्ततेसाठी प्रहार कामगार संघटनेच्या वतिने विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्ष अॅड. हर्षल चिपळुणकर यांच्या मार्गदर्शनात जटपूरा गेट येथे बुधवारला सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भर उन्हात धरणे आंदोलन करण्यात आले. मागील १५ वर्षापासून नगरपरिषद व महानगरपलिका येथील पाणी पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यांना लागू करण्यात आलेल्या किमान वेतनापासून वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच भविष्य निधी, राज्य कर्मचारी विमा व इतर कल्याणकारी योजनांपासून त्यांना वंचित ठेवण्यात येत आहे. तसेच या कामगारांचे मासिक वेतनही वेळेवर देण्यात येत नाही. प्रशासनाने कामगारांना तीन ते चार महिन्याचे वेतन दिले नाही. त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ३ दिवसांच्या आत वेतन देण्याची मागणी विदर्भ प्रहार कामगार संघटनेकडून धरणे आंदोलनातून करण्यात आली आहे. चंद्रपुरात ४५ ते ४६ अंश तापमान असूनसुद्धा विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या अध्यक्ष अॅड. हर्षल चिपळुणकर व कंत्राटी कामगार जटपूरा गेट येथे आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)या आहेत मागण्याथकित वेतन तीन दिवसांच्या आत द्यावे, कंत्राटदारांने बेकायदेशिररित्या कामावरुन बंद केलेल्या कर्मचारी व कामगारांना तीन दिवसांच्या आत पूर्ववत कामावर घ्यावे, किमान वेतन कायद्याप्रमाणे आजपर्यंतच्या वेतनाच्या फरकाची रक्कम बॅकेत सात दिवसाच्या आत जमा करावी, सर्व कामगारांची आजपर्यंतची भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा सात दिवसाच्या आत जमा करावी, कर्मचारी विमा योजनेतंर्गत सर्व कामगारांचे पंजीयन त्याच्या नियुक्तीपासून व्हावे, व त्याां ई.एस.आय चे कॉर्ड देण्यात यावे, प्रत्येक महिन्याच्या सात तारखेपर्यंत मागील महिन्याचे वेतन बॅकेमार्फत मिळावे, शासनाच्या किमान वेतन, पी.एफ.ई.एस.आय व ईतर कायद्याचे तंतोतंत पालन कंत्राटदाराने करावे, कामगार कायद्याचे पालन होते की नाही, याकडे साहायक कामगार आयुक्त व चंद्रपूर मनपा आयुक्तांने लक्ष द्यावे, कर वसूली कर्मचाऱ्यांना वसूल पाणी कर भरणा केल्याची रक्क मेच्या नोंदीसह पोचपावती कंत्राटदाराने द्यावी आदी मागण्याचा समावेश आहे.
विदर्भ प्रहार कामगार संघटनेचे धरणे आंदोलन
By admin | Published: April 27, 2017 12:45 AM