या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत बी.पी., मधुमेह, ऑक्सिजन पातळी, हृदयरोग तपासणी करण्यात आली व विशेषतः स्त्रियांच्या आरोग्य समस्यांचे मोफत वैद्यकीय तपासणी करून त्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सर्व रुग्णांना डॉ. जयंत मूर्तिजापूरकर यांच्याकडून मोफत औषधे वितरित करण्यात आली. गावातील १३१ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला होता. डॉ. पूजा लांडगे, डॉ. हर्षल घोडे, डॉ. साई शिंदे, डॉ. स्वप्निल पोटे, डॉ. राजश्री मोडक, डॉ. नरेश शिंदे, डॉ. अंकुश कोल्हे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशस्वितेसाठी ग्रामविकास कृती समितीचे अध्यक्ष राजू लांडगे, सदस्य अशोक भोयर, विजय पाझारे, प्रदीप लांडगे, नारायण शिकारदार, नानाजी शिकारदार, देवानंद मारबते यांनी परिश्रम घेतले.
220821\img20210815103454.jpg
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रोग निदान शिबिराने साजरा