लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निवडणुकांची घोषणा झाली की ग्रामीण व शहरी भागातील पेंटरला चांगले दिवस यायचे. परंतु आता डीजिटल व सोशल नेटवर्किंगचे युग अवतरले. निवडणूक प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष याच माध्यमांचा सर्वाधिक वापर करू लागल्याने पेंटर, कलावंत व कारागिरांना कामे मिळणे कठीण झाले आहे.राजकीय पक्षांच्या जाहीरसभा आयोजित करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी उमेदवारांचे पोस्टर व फलक रंगविण्याची कामे पेंटरला मिळत होती. मात्र संगणक आल्याने पोस्टर, फलक व होर्डिंग्जची सर्व कामे पेंटरपासून दुरावली. संगणाचा वापर करणारी मोठी दुकाने सुरू झाल्याने पेंटरच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराला प्रचाराच्या दृष्टीने आपआपल्या मतदार संघातील भागात मोठे पोस्टर, बॅनर व होर्डिंग्ज लावणे आवश्यक झाले आहे. पण, आता डीजिटल बॅनरकडे सर्वच राजकीय पक्षांचा कल वाढला. विरोधी उमेदवारापेक्षा अधिक जोमाने प्रचार करण्यासाठी हायटेक तंत्राचा वापर करणे सुरू झाले. परिणामी, पेंटरला मिळणारी हंगामी कामे बंद झाली. त्यांच्या रोजगारावर कुºहाड कोसळली.लोकसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. उमेदवारांनी प्रचार साहित्याची जमवाजमव सुरू केली. मात्र पेंटरला कुणी विचारत नाही, अशी स्थिती दिसून येत आहे. १० वर्षापूर्वी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी इच्छुक उमेदवार विविध कार्यक्रमाचे निमित्त साधून प्रसिद्धी करून घेत होते. उमेदवारांच्या नावाने घरांच्या भिंती पेंटने रंगविण्याची कामे मिळत होती. निवडणूक आयोगाने भिंती रंगविण्यावर निर्बंध लावले. घरमालकाच्या परवानगीशिवाय भिंती रंगविणे गुन्हा ठरविला. मात्र, संगणकामुळे मोठे पोस्टर व होर्डिंग्ज तयार करण्याची सोय झाली. पेंटरचा व्यवसाय डबघाईस आला. प्रचारासाठी लाखो रुपये खर्च होत असले तरी पेंटरला काही उपयोग नाही. काही पेंटर मंडळींनी आता डीजिटल बॅनरचा व्यवसाय सुरू केला आहे. रंग व ब्रश याचा वापर कालबाह्य ठरत आहे.
डीजिटल युगात पेंटींग व्यवसाय डबघाईला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:18 PM
निवडणुकांची घोषणा झाली की ग्रामीण व शहरी भागातील पेंटरला चांगले दिवस यायचे. परंतु आता डीजिटल व सोशल नेटवर्किंगचे युग अवतरले. निवडणूक प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्ष याच माध्यमांचा सर्वाधिक वापर करू लागल्याने पेंटर, कलावंत व कारागिरांना कामे मिळणे कठीण झाले आहे.
ठळक मुद्देकलावंत, कारागीर हतबल : राजकीय पक्षांचा रेडीमेडकडे प्रचार साहित्याकडे ओढा