चंद्रपूर : प्रभादेवी स्कूल ऑफ नर्सिंगच्यावतीने आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रम संस्थेचे कार्यालय न्यू इंग्लिश शाळेच्या बाजूला घेण्यात आला. यावेळी शासकीय नर्सिंग स्कूलच्या ट्यूटर अस्मिता रायपूरे व शासकीय रुग्णालयाच्या मेट्रन माया आत्राम तसेच प्रभादेवी स्कूल ऑफ नर्सिगचे संचालक अविनाश खैरे, सेंट पॉल स्कूल बामणीच्या संचलिका नीना खैरे, प्राचार्य मंदा थेरे, सौरभ कठाणे, मनिषा म्हैसकर, पायल हाडे, शॉरोन मिठा आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य थेरे यांनी नियमित व्यायाम व पुरेसा सकस आहार घेतल्याने रोगाला प्रतिबंधक आळा घालता येतो असे सांगून आहाराचे महत्त्व पटवून दिले. अविनाश खैरे यांंनी शरीराच्या उत्कृष्ट वाढीसाठी योग्य आहाराची आवश्यकता असल्याचे सांगून फळे, भाजी, कडधान्य, अंडी, मांस, दूध या साधनाच जेवणात समावेश असावा याबाबतचे महत्त्व परिचारिकांनी पटवून द्यावे, असे सांगितले. यावेळी सलाद स्पर्धा आयोजित केली होती. त्यात अनेक विद्यार्थिनींनी सहभाग घेत वेगवेगळ्या प्रकारच्या डिश तयार केले होते. स्पर्धेचे परीक्षण अस्मिता रायपूरे, माया आत्राम, अविनाश खैरे, नीना खैरे, मंदा खैरे यांनी केले. संचालन पूजा कन्नाके तर आभार प्रणाली सेलवटे, पूजा उमरे, प्रिया रामटेके यांनी मानले.
प्रभादेवी नर्सिंग स्कूलमध्ये आहार सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:33 AM