शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

बसफेऱ्या बंद असल्याने रुग्णांना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:29 AM

चंद्रपूर : येथे विविध आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील रुग्ण त्यांच्याकडे तपासणीसाठी येत असतात. मात्र, लॉकडाऊन सुरू असल्याने ...

चंद्रपूर : येथे विविध आजाराचे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील रुग्ण त्यांच्याकडे तपासणीसाठी येत असतात. मात्र, लॉकडाऊन सुरू असल्याने बसफेऱ्या बंद केल्या आहेत. परिणामी, या रुग्णांना चंद्रपूर गाठण्यास अडचण जात आहे. परिणामी, त्यांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हॉस्पिटलच्या कारणांनी येणाऱ्यांसाठी बसमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी होत आहे.

कृषी कर्ज देण्याची मागणी

चंद्रपूर : शेतकऱ्यांना नव्या हंगामासाठी शासनाकडून कृषी कर्ज देण्यात येते. बहुतांश शेतकऱ्यांनी मागील वर्षीचे कर्ज भरले. मात्र, त्यानंतर लॉकडाऊन सुरू करण्यात आले. परिणामी, शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना त्वरित कृषी कर्ज देण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावर पडलेले असतात मास्क

चंद्रपूर : शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात मास्क पडून दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. जनावरांही धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर मास्क फेकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर

पोंभूर्णा : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्तीबाबत प्रशासनाकडून प्रभावी जनजागृती केली जात नसल्याने शौचालयाचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे.

कृषिपंपाच्या बिलात दुरुस्ती करावी

भद्रावती : वीज वितरण कंपनीच्या वरोरा उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वरोरा व भद्रावती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना चुकीचे वीजबिल देण्यात आले, शिवाय काही शेतकऱ्यांच्या कृषिपंप वीज जोडणीची प्रक्रियाही प्रलंबित आहे. मनमानी देयक पाठविल्याने शेतकऱ्यांनी भरणा केला नाही. त्यामुळे आधी बिलात दुरुस्ती करावी. त्यानंतरच भरणा करू, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बाराजारातील कचरा हटविण्याची मागणी

गडचांदूर : येथील रेल्वे फाटकाजवळ असलेला कचरा डेपो बंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला असून, स्वच्छतेची मागणी केली आहे.

बुद्धगुडा गावातील समस्या सोडवा

जिवती : तालुक्यातील बुद्धगुडा हे गाव अनेक समस्यांनी ग्रासले आहे. या गावात अजूनही योग्य रस्ते नाही. त्यामुळे गावातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे हिमायतनगर ते बुद्धगुडा येथील समस्या सोडवाव्या, तसेच रस्ता तयार करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

परवाना शिबिराची गरज

सावली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम अवगत नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून आजवर जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टर चालकांसाठी परवाना शिबिर भरविण्याची गरज आहे. पूर्वी असे शिबिर राबविण्यात येत होते.

तोट्यांअभावी पाणी वाया

राजुरा : येथील नागरिकांकडे नळ आहेत, परंतु काही नागरिकांच्या नळाला तोट्या नाहीत. त्यामुळे ओव्हर फ्लो झाल्यानंतर, तसेच पाणी भरून झाल्यानंतर उर्वरित पाणी वाया जाते. स्थानिक प्रशासनाने प्रत्येक नागरिकांच्या नळाला तोट्या लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी आहे.

पुलावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका

कोरपना : कोरपना-गोविंदपूर-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने, जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला, परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे.

पदोन्नतीचा प्रश्न अजूनही प्रलंबित

वरोरा : नगरपरिषदेंतर्गत कार्यरत स्वच्छता कामगारांची शैक्षणिक पात्रता असताना पदोन्नती देण्यात आली नाही, असा आरोप होत आहे. कर्मचाऱ्यांना पदोन्नतीअभावी केवळ स्वच्छता कर्मचारी म्हणून वर्षानुवर्षी काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे.

निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत

कोरपना : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. काही कोंडवाड्यांचे छप्पर उडून गेले असल्याची स्थिती आहे.

शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी

जिवती : आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी बांधवासाठी विविध योजना राबविण्यात येतात. यंदा कोरोनामुळे योजनांसाठी निधी मिळाला नाही. त्यामुळे तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात योजनाच पोहोचल्या नाहीत. राज्य शासनाने निधीची तरतूद करून जिल्ह्यासाठी देण्याची मागणी होत आहे. शासकीय योजनांची अमंलबजावणी होणे गरजेचे आहे.

-----

रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी

सावली : तालुक्यातील काही गावांची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्या तुलनेत परिसरातील रस्ते अरुंद असल्याने अपघाताची शक्यता आहे. रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सरकारी निवासस्थाने झाली दुर्लक्षित

सिंदेवाही : शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने निवासस्थाने बांधून दिलेली आहेत. मात्र, याचा उपयोग अपवादानेच केला जात आहे.

जिवती तालुक्यातील समस्या सोडवा

जिवती : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील अनेक समस्या आजही सुटलेल्या नाहीत. जिवती तालुक्याची स्थापना होऊन आता अनेक वर्षे झाली, तरीही वीज, रस्ते, पाणी अशा मूलभूत सुविधाही येथे पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. या सुविधांअभावी येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

गडचांदूर-जिवती मार्गावरील खड्डे बुजवा

जिवती : गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. परिणामी, मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. वाहतुकीसाठी त्रासदायक ठरलेल्या या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.