लोकमत न्यूज नेटवर्कमूल : चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील जानाळा ते मूलकडे जाणाºया बफर झोन क्षेत्रात खाजगी कंपनीतर्फे केबल टाकण्यासाठी विना परवानगीने खोदकाम केले जात आहे. या खोदकामामुळे बफ रझोन क्षेत्रातील जानाळा परिक्षेत्रात वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. याकडे वन अधिकाºयांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा वन्यप्रेमीमध्ये सुरू आहे. केबलधारकांशी साटेलोटे करून विना परवनगीने वनाधिकाºयांनी कंत्राटदारांना अभय दिल्याने वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया वन्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.जंगलात वन्यप्राण्यांचे मुक्तपणे संचार व्हावे, व त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी बफर झोनची निर्मीती करण्यात आली. मूल वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात संचार असून वन्यप्राणी चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरून ये-जा करीत असतात. याच महामार्गावरील जानाळा-मूल परिक्षेत्रातील जंगलाच्या कडेला भ्रमणध्वनीच्या केबलसाठी खोदकाम केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व वनपरिक्षेत्र कार्यालय मूल यांची परवानगी न घेता केबलसाठी खोदकाम केले जात असल्याने वन्य प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी केबलधारक कंत्राटदारांशी चिरीमिरी करून परवानगी न घेता केबल टाकण्यासाठी प्रोत्साहन दिल्या जात आहे. या गंभीर बाबीकडे वनविभाग पुर्णत: दुर्लक्ष करीत असत्याचे दिसून येते.करोडो रूपये खर्च करून वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी बफरझोनची निर्मीती केली असताना मात्र वन अधिकाºयांच्या दुर्लक्षपणामूळे वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी वन्यप्रेमीकडून होत आहे.चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील जानाळा-मूल या बफ र झोन वन परिसरातील जंगलात केबल टाकण्यासाठी वनविभागाने परवानगी दिलली नाही.-ए.एस.कोसरेक्षेत्र सहाय्यक जानाळा
परवानगी न घेता जंगलात खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:08 PM
चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील जानाळा ते मूलकडे जाणाºया बफर झोन क्षेत्रात खाजगी कंपनीतर्फे केबल टाकण्यासाठी विना परवानगीने खोदकाम केले जात आहे.
ठळक मुद्देखासगी कंपनीचा प्रकार : वन्यप्राण्यांना धोका