प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : गावातील पाण्याचे स्त्रोत आटले. पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. उन्हाळा आला की गावकऱ्यांचे पाण्यासाठी होणारे हाल नागरिकांच्या नशिबालाच चिकटलेले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करीत गावापासून दूर शिवारात असलेल्या चार विहीर पाण्यासाठी विकत घेतल्याने पाचगाववासीयांना आता चक्क पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.राजुरा तालुकास्थळापासून २२ कि. मी. अंतरावर असलेले पाचगाव हे दाट लोकसंख्या असलेले गाव. उन्हाळा आला की या गावातील पाण्याचे स्रोत हळूहळू आटायला सुरू होतात. पाचगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी खाली गेली आहे. पाचगाव येथे दोन शासकीय विहिरी आहेत. संपूर्ण गाव याच विहिरीवर पाणी भरायचा. मात्र पाण्याची पातळी खाली गेल्याने पाण्याने विहिरीचा तळ गाठला आहे. गावात पाणीपुरवठा नळयोजना आहे. पंरतु टाकीला पाणीपुरवठा करणारी विहीरच आटल्याने नळयोजना प्रभावित झाली आहे. विहिरीत तीन-चार दिवस पाणी साठवणूक झाल्यानंतर चार दिवसाआड नळयोजनेचे पाणी गावकºयांना सोडले जाते. त्यामुळे पाचगाववासीयांची पाण्यासाठी भटंकती सुरू झाली. बैलबंडीने मिळेल तिथून पाणी आणून गावकरी आपली तहान भागवित होते. मात्र गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता गावातील ग्रामपंचायत प्रशासनाने गावापासून दोन कि.मी. अंतरावरील दूर शिवारात असलेल्या विहिरी गावकऱ्यांच्या पाण्यासाठी विकत घेतल्या. त्यामुळे नागरिकांना बैलबंडीवर ड्रम बांधून विहिरीतून पाणी उपसावे लागत आहे. पाचगाव परिसरात पाण्याची पातळी खालावून जलसंकट ओढवले आहे.पाझर तलावाची निर्मिती करावीपाचगाव परिसरात पाण्याची भीषण टंचाई लक्षात घेता गावातील घरगुती बोअरवेल, सरकारी विहिरी पूर्णत: कोरड्या पडल्या आहेत. मात्र यावर शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. त्यासाठी शासनाने पाचगाव परिसरात पाझर तलावाची निर्मिती करावी, अशी मागणी पाचगावचे उपसरपंच गोपाल जंबुलवार, रूपेश गेडेकर, तंटामुक्त अध्यक्ष तिरूपती इंदूरवार, पं.स. सदस्य सुनंदा डोंगे, सुधाकर गेडेकर, शंकर गोनेलवार, किसन पिंपळकर, दशरथ भोयर, शंकर खामनकर, गंगाधर गेडेकर, लक्ष्मण तुलावार, रामदास खाडे यांनी केली आहे.पाचगाव येथील पाणीपुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. त्यामुळे गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल लक्षात घेता ग्रामपंचायत प्रशासनाने शिवारातील चार विहिरी पाण्यासाठी विकत घेऊन गावकºयांना पाण्याची सोय करून दिली आहे.- गोपाल जंबुलवार, उपसरपंच, पाचगाव.
पाचगाववासीय मोजतात पाण्यासाठी पैसे..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:14 PM
गावातील पाण्याचे स्त्रोत आटले. पाणी पुरवठा नळयोजनेला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली. त्यामुळे नळाला पाणी येत नाही. उन्हाळा आला की गावकºयांचे पाण्यासाठी होणारे हाल नागरिकांच्या नशिबालाच चिकटलेले आहे. मात्र गावातील ग्रामपंचायतीने यावर उपाययोजना करीत गावापासून दूर शिवारात असलेल्या चार विहीर पाण्यासाठी विकत घेतल्याने पाचगाववासीयांना आता चक्क पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे.
ठळक मुद्देविहिरीतून घेतात पाणी विकत : पाणीपुरवठा नळयोजना आटली, गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल