तीन हजार दिव्याची आरास
घुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्राच्या रामनगर कामगार वसाहतमधील राम मंदिरात श्रीराम सेवा समितीच्या वतीने त्रिपुरी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा तसेच देवदिवाळीनिमित्त सोशल डिस्टनचे पालन करून मास्क वापरून दीपोत्सव साजरा करण्यात आला.
श्रीराम व लक्ष्मण सीतामाई यांची विधीवत पूजा अर्चना करून दीप आरती केली. सर्वांनी श्री राम भगवान यांना या देशातून कोरोना महामारीचे संकट जाऊ दे, तसेच सर्व देशवाशीयांना आरोग्य शांती सुख समाधान मिळो, अशी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी तीन हजार दिव्याची आरास लावण्यात आली. या दीपोत्सवामुळे श्री राम मंदिर लखलखाटाऊन गेले. या कार्यक्रमासाठी हा दीपोत्सव खूप सुंदर दिसत होता. रांगोळी काढून जय श्रीराम ओम स्वस्तिक यावर दीपोत्सव दिवे लावण्यात आले. याकरिता जि. प. महिला व बाल कल्याण सभापती नितू विनोद चौधरी, श्रीकांत सावे यांनी आर्थिक सहकार्य केले. याकरिता श्रीराम मंदिरचे पुजारी विवेक उर्फ राजा पांडे, श्री राम मंदिरचे अध्यक्ष श्रीकांत माहुलकर, उपाध्यक्ष महेश लक्काकुला, दीपक जयस्वाल, सदस्य बबन महल्ले, हरेंद्र अंड्रस्कर, घनशाम चानीकर, सहगल, अर्चना गोजे, प्रणिता माहुलकर, सनोडीया, सुचिता पांडे यांच्यासह श्रीराम मंदिर सेवा समितीचे सदस्य भक्त जण यांनी दीपोत्सव अथक परिश्रम घेऊन यशस्वी केला.