रिता जिलटे : विसापुरात धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रम ुबल्लारपूर : धम्माचे आचरण हे समाजाला दिशादर्शक असून प्रत्येकाने ते अंगिकारावे, असे प्रतिपादन विसापूरच्या सरपंच रिता जिलटे यांनी केले.विसापुरातील ग्रामपंचायत भवन समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुरूवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संजय गावंडे होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना बल्लारपूर पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिगामी व्यवस्थेला नाकारले. त्यांच्या नेतृत्वात लाखो अनुयायांनी अहिंसक रक्तविहीत क्रांती केली. तो इतिहासातील महत्वपूर्ण क्षण होता. पारतंत्र्याचे बंधन झुगारुन कोट्यवधी माणसांना स्वतंत्र व नवजीवन देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मदीक्षा सामाजिक क्रांती घडविणारी घटना होती, असे सांगितले.यावेळी मंचावर ग्रामपंचायत सदस्य शशीकला जीवने, विजय वैद्य, पी. एल, शेंडे, शिवदास वैद्य, रामदास गाडगे, शंकर तेलंग, दादाजी जीवने, रुषी नगराळे यांची उपस्थिती होती.येथील डॉ. आंबेडकर भवन, सिद्धार्थ वाचनालय, त्रिरत्न बौद्ध विहार, अशोका बुद्ध विहार, पंचशील बुद्ध विहार येथे सामाजिक कार्यकर्तांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी समाजबांधवांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
धम्माचे आचरण समाजाला दिशादर्शक
By admin | Published: October 26, 2015 1:14 AM