कंत्राटी सेवा पुरविण्याच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याचा उल्लेख या पत्रात आहे. तरीसुद्धा तत्कालीन अधिष्ठाता यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला आहे.
वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांच्या डेरा आंदोलनाला ४० दिवस पूर्ण झालेले आहेत. या आंदोलनावर तातडीने तोडगा काढण्याचे आदेश स्वतः वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आठवड्याभरापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले असून मंत्रालय स्तरावर याबाबत वेगाने कार्यवाही सुरू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान डेरा आंदोलनाला चंद्रपूर येथील ज्येष्ठ व्हॉलिबॉल संघाचे अध्यक्ष प्रदीप जानवे, उपाध्यक्ष श्यामकांत थेरे, सचिव दीपक जेऊरकर, कोषाध्यक्ष आर. व्ही. कापरबोईना, सिद्धार्थ वाघमारे, संतोष बोरीकर, दत्ताभाऊ कडूकर, मुन्ना ठाकूर, अरुण येरावार, अविनाश पवार, राजू चौधरी, राष्ट्रवादीचे नितीन पिंपळशेंडे, पीयुष कुंभारे, विदर्भ राज्य युवा आघाडी अध्यक्ष सुदाम राठोड, माहिती अधिकार पत्रकार संघ समिती उपजिल्हाप्रमुख अविनाश ऊके, शहराध्यक्ष योगेश मोहेकर आदींनी भेट देवून पाठींबा दर्शविला आहे.