लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एसटीमधून प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वयाची अट लागू केल्या जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य शासनाने ६० वर्षे वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र, एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्के सवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट पुढे केली जाते.राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये प्रवासी सवलत मिळविण्यासाठी वयाच्या अटीवरून अनेक मतप्रवाह आहेत. काही वाहक ६० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात तर काही वाहक ६५ वर्षांची अट घालतात. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक म्हणून असलेल्या ओळखपत्राच्या सत्यतेबाबतही वाहकांकडून विचारणा होत असल्याने अनेकदा ओळखपत्रामधील वय आणि छायाचित्रातील चेहरा यावरून वयाचा अंदाज लावून प्रवासाची सवलत नाकारली जात असल्याचेही प्रकार घडतात. काही ज्येष्ठ नागरिक ६० वर्ष असल्याने सवलतीसाठी आडून बसतात. शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्राबाबतही अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात. बसने प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वय लागते, असे वाहकाकडून सांगितले जाते. शिवाय, बसस्थानकात विनाहक-विनाथांबा बससाठी आगाऊ तिकीट बुकिंगसाठीही हीच अट लावल्या जाते. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.संभ्रम तात्काळ दूर करावासर्व प्रकारच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरुन ६० वर्षे करण्यात आली, अशी घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी जुलै २०१८ मध्ये केली होती. ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक उन्नती, ताणतणावातून मुक्त, उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले. त्यांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले. परंतु, एसटी विभागात हा संभ्रम अद्याप कायम आहे.योजना कागदावरचज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी शासनाने अनेक योजना तयार केल्या. संबंधित अधिकारी योजनांची अंमलबजावणी करीत नाही. ग्रामीण भागात एसटी महत्त्वाचा आधार मानली जाते. पण, प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळत नाही. नियम कागदावरच राहतात. याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो. अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे.
६० वर्षांवरील नागरिक सवलतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:25 AM
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : एसटीमधून प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वयाची अट लागू केल्या जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये ...
ठळक मुद्देसंडे अँकर । ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी, एसटीने ६५ वर्षांची अट रद्द करण्याची प्रवाशांची मागणी