लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व शहरी झोपडपट्टी भागातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेले रूग्ण औषधोपचाराकरिता येतात. उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांसोबत व त्यांच्या नातलगांसोबत रुग्णालयातील कर्मचारी, नर्स व डॉक्टर गैरव्यवहार करतात. यासोबतच रूग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत.रुग्णांच्या या गैरसोयीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे. रूग्णालयात रूग्णांसोबत व त्यांच्या नातलगांसोबत केला जाणारा गैरव्यवहार व रूग्णांची गैरसोय थांबविण्यात यावी, अशी मागणीही तक्रारीतून करण्यात आली आहे.वैद्यकीय उपचारादरम्यान डॉक्टरांकडून दुर्लक्ष केले जाते. व्यवस्थित उपचार केला जात नाही. औषधाचा तुटवडा असल्याचे कारण देत रूग्णांना डॉक्टरांकडून बाहेरच्या महागड्या औषधी घेण्यास भाग पाडले जाते. अशा प्रकारच्या रुग्णांच्या अनेक तक्रारी आहेत. यापुढे असे होता कामा नये. असे करणाºयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मनसेने केली आहे. शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी रूग्णांकरिता २४ तास उपलब्ध असावी, अशीही मागणी करण्यात आली.रुग्णालयातील प्रसूती वार्डमध्ये प्रसूती झाल्यानंतर तेथील कर्मचारी नातलगांकडून ५०० ते हजार रुपये मागतात. ही पध्दत तत्काळ बंद करण्यात यावी. तसेच रुग्णालयातील सर्व वार्डमध्ये नियमित योग्य साफसफाई करण्यात यावी, अशी मागणीही मनसेने केली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी चर्चा करताना व निवेदन देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक सचिन भोयर, महिला सेना जिल्हाअध्यक्ष सुनिता गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, शहर सचिव सचिन कोतपल्लीवार, भरत गुप्ता, शहर उपाध्यक्ष, महेश वासलवार, संजय फरदे, राकेश पराडकर, राहुल लटारे, मायाताई मेश्राम इत्यादी उपस्थित होते.संबंधित तक्रारीची दखल न घेतल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.रुग्णांची दिशाभूलजिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात मोठ्या संख्येने खासगी रूग्ण वाहीका उभ्या राहतात. त्या रूग्णवाहिकाधारकांकडून रूग्णालयात येणाºया रूग्णांना भूल देऊन त्यांना खासगी रूग्णालयात घेऊन जातात व खासगी रूग्णालयांकडून कमिशन खातात. हा कमीशनखोरीचा धंदा तत्काळ बंद करण्यात यावा. संबधित रूग्णवाहिकाधारकांवर कार्यवाही करण्यात यावी. त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणीही मनसेने केली आहे.खासगी रूग्णालयात रेफरसामान्य रूग्णालयातील बहुतांश डॉक्टरांची खासगी प्रॉक्टिस सुरू आहे. येथील काही डॉक्टर तर सामान्य रूग्णालयात रूग्णांना आपल्याच क्लिनिकमध्ये रेफर करीत असल्याची माहिती आहे.एकाच पलंगावर तीन रूग्णवातावरणाच्या बदलाने जिल्हाभरात सध्या तापाची साथ पसरली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयही सध्या रूग्णांनी हाऊसफुल्ल आहेत. मात्र, रूग्णालयातील कित्येक खोल्यांत बेडची संख्या कमी आहे. त्यामुळे एकाच बेडवर तीन तीन रूग्ण उपचार घेत आहेत. शेकडो रूग्णांवर खाली उपचार सुरू आहेत. सध्या ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखीचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी येत आहेत. अनेक रूग्णांना भरतीही केले जात आहे. वॉर्ड क्रमांक पाच येथे केवळ पंचवीस बेड आहेत. मात्र, या वॉर्डात तब्बल ७० रूग्ण भरती आहेत. बेड कमी आणि रूग्ण जास्त आहेत. त्यामुळे एका बेडवर तीन-तीन रूग्ण उपचार घेत आहेत. काही रूग्णांवर खाली झोपवूनच उपचार सुरू आहेत. ७० रूग्णांच्या सेवेसाठी केवळ एक परिचारिका आहे. औषधांचाही तुटवडा आहे.
रूग्णालयात रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:36 PM
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठ्या संख्येने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व शहरी झोपडपट्टी भागातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेले रूग्ण औषधोपचाराकरिता येतात. उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांसोबत व त्यांच्या नातलगांसोबत रुग्णालयातील कर्मचारी, नर्स व डॉक्टर गैरव्यवहार करतात. यासोबतच रूग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत.
ठळक मुद्देमनसेची तक्रार : रुग्णांच्या नातलगांना असभ्य वागणूक