प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन : गोंडवाना विद्यापीठाचा उपक्रमचंद्रपूर : जनता महाविद्यालय येथील सभागृहामध्ये दोन दिवसीय ‘आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे’ गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने आयोजन केले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जनता महाविद्यालयाच्या २२ विद्यार्थ्यांना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या १९, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील २०, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील २४ विद्यार्थ्यांनी अशा ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने जनजागृती निर्माण व्हावी, हा उद्देश समोर ठेवून गोंडवाना विद्यापीठाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण योजना राबविण्याचे ठरविले होते. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे उपस्थित होते. डॉ. जीवतोडे यांनी भाषणातून आपत्ती व्यवस्थापन मानवाच्या जीवनात किती गरजेचे आहे, याचे महत्त्व पटवून दिले. तसेच अध्यक्षीय भाषणातून डॉ. एम. सुभाष यांनी मानवी जीवनात सातत्याने आपत्ती येत असतात. या आपत्तीचे निराकरण नियोजन पूर्वक केल्यास त्या आपत्तीची तीव्रता आपण कमी करू शकतो, हे पटवून दिले. प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी डी.एम. घुगे यांनी आपत्तीपूर्वी आपत्तीच्या काळात किंवा आपत्तीच्या नंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना मदत करण्यास सज्ज राहावे. त्यामुळे आपत्तीची तीव्रता किंवा हानी कमी होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण विभाग अधिकारी डॉ. जी.ए. शंभरकर यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमास डॉ. मिलिंद जांभूळकर, डॉ. किशोर ठाकरे, प्रा. आय.एस. कोंड्रा आदी उपस्थित होते. आपत्ती व आपतकालीन व्यवस्थापन या विषयावर मुख्य अग्निशमन अधिकारी डी.ए. ढोमणे यांनी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रामध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन कायदे, नियम आणि प्रथमोपचार’, या विषयासंबंधी प्रा. दिलीप रामटेके आणि सामाजिक कार्यकर्ते संजय वैद्य यांनी व्यक्त केले. ‘आपत्ती व्यवस्थापन पूर आणि आग’, या विषयासंबंधी डॉ. योगेश्वर दुधपचारे आणि डॉ. वाय. बी. गेडाम यांनी विचार मांडले. ‘आपत्ती व्यवस्थापन आणि सामाजिक बांधिलकी’, या विषयावर पर्यावरणाचे अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे व सार्डचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले. अंकुश अवथे यांनी आपत्तीचे प्रथमोपचार करण्याबाबत प्रात्यक्षिके करून दाखविले.समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. सुभाष होते. प्रमुख अतिथी डॉ. महेश वानखेडे व प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर उपस्थित होते. संचालन अरविंद तिरणकर व आभार प्रदर्शन डॉ. पीयूष मेश्राम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन सुरवाडे, दिनेश चामाटे, राकेश कन्नाके, गणेश नैताम, विजय भगत, अविनाश घटे यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
८५ विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
By admin | Published: January 23, 2017 12:42 AM