विद्यार्थ्यांची तक्रार : अद्याप दखल नाहीबल्लारपूर : शिक्षणबाह्य कामे करण्यासाठी नकार दिल्याने, संचालकाने जाणिवपूर्णक हजेरीपटावर अशा विद्यार्थ्यांना गैरहजर दर्शवून त्यांना परीक्षेत बसण्यापासून वंचित ठेवले आहे. स्थानिय मोंटफोर्ट आयटीआयमधील अशा सहा पीडित विद्यार्थ्यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाणे, संबंधित अधिकारी, मंत्री यांच्याकडे केली आहे. मात्र, कुठूनही या विद्यार्थ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. २७ जुलै रोजी परीक्षा आहे. संचालकाच्या मनमानीमुळे परीक्षेत बसता न आल्यास या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार आहे. परीक्षेला बसता यावे, यासाठी या विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. या विद्यार्थ्यांनी आपली कैफियत बुधवारी पत्रपरिषदेत मांडली.हे सर्व विद्यार्थी फीटर ट्रेडचे असून त्यात प्रथम वर्षाचा एक तर अन्य द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. मोंटफोर्ट आयटीआयमध्ये फीटर ट्रेडच्या विद्यार्थ्यांना मोठी लाकडे उचलून मशिनवर कापणे, झाडू लावणे, नाली साफ करणे, बगीचातील गवत काढणे आदी ट्रेडशी संबंधीत नसलेली कामे संचालक करायला लावतात, असा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. काम करण्यास नकार दिल्यास अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या जातात. दोन वर्षाची फी ६० हजार रुपये भरले आहेत. (तालुका प्रतिनिधी)विद्यार्थ्यांनी मागितली आत्महत्येची परवानगीमोंटफोर्ट आयटीआयच्या एका पीडित विद्यार्थ्याने संचालकाच्या मनमानीची तक्रार मुख्यमंत्र्याकडे केली असून, आपण त्रस्त झालो आहोत. मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे, मला आत्महत्या करण्याची परवानगी देण्यात यावी असे पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठविले आहे.विद्यार्थ्यांचे आरोप खोटे - अरूण ताकसांडेबल्लारपूर : मोंटफोर्ट आयटीआय व्यवस्थापनाने गुरुवारी पत्रपरिषद घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले. विद्यार्थ्यांनी आमच्यावर केलेले आरोप खोटे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मुळात हे विद्यार्थी आयटीआयमध्ये वर्गाला नियमीत हजर राहतच नाहीत. ८० टक्केहून कमी उपस्थिती असणाऱ्यांना परीक्षेला बसता येत नाही. तरीही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी अशा विद्यार्थ्यांनी नवीन सत्रापासून वर्गात येऊन बसून कोर्स पूर्ण करावा. सहा महिन्यानंतर होणाऱ्या परीक्षेत त्यांना आम्ही अवश्य बसवू, असे आश्वासन प्राचार्य अरुण ताकसांडे यांनी या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर दिले.
आयटीआय विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा डाव
By admin | Published: July 18, 2015 12:53 AM