लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलनाची नोटीस प्रशासनाला देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने संघटनच्या सदस्यांची चर्चात्मक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अनेक समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आला.चर्चेमध्ये संघटना प्रतिनिधींनी त्यात एकस्तर व वरिष्ठ वेतन श्रेणी, आदिवासी नक्षलग्रस्त वेतन श्रेणी, प्रलंबित जीपीएफ पावत्या, प्रलंबित बिले याबाबत मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी मातकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.चर्चेमध्ये खालील समस्यांवर निघाला तोडगा२५४ प्राथमिक शिक्षकांची प्रलंबीत वरिष्ठ वेतन श्रेणी येत्या आठवड्यात मजूर करण्यात येईल, विषय शिक्षक पदस्थापना ५ जानेवारीपर्यंत करण्यात येईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षक समायोजन करण्यात येईल. विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया पार पडेल. चिमूर तालुक्यातील शिक्षक गोविंद गोहणे यांनी न्याय मागण्यासाठी पत्रव्यवहार करू नये, असे तुघलकी फर्मान काढणारे गटशिक्षणाधिकारी तसेच तालुक्यातील अनेक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर होऊनही अजून लाभ न देणाºया संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, पात्र असलेल्या विज्ञान विषय शिक्षकांना वेतनश्रेणी मंजूर करणे, आदिवासी भागातील प्रलंबित एकस्तर वेतनश्रेणीबाबत वरिष्ठांना मागणी करणे, प्रलंबीत सेवापुस्तक पडताळणी मार्गी लावणे, प्रलंबीत शैक्षणिक अर्हता परवानगी प्रस्तावास मंजुरी देणे, आदेशांचे बुकलेट बनवून देणे, आंतरजिल्हा बदली शिक्षकांचे माहे मे महिन्यांचे प्रलंबीत वेतन अदा करणे, भविष्य निर्वाह निधी पावत्यांसाठी शेडूल प्रलंबीत असलेल्या तालुक्यांना नोटीस बजावणे व तत्काळ संकलित करणे, स्थायी आदेश, वैद्यकीय देयक, सहाव्या वेतन आयोगाचे हप्ते जमा करणे, हिंदी मराठी सूट प्रस्ताव मजुरी तसेच अन्य वैयक्तिक समस्या संबंधित विभागाला देऊन मार्गी लावण्यात येणार असल्याचे आवाहन यावेळी संघटनेच्या शिष्टमंडळाला देण्यात आले.
पुरोगामी शिक्षक संघटनेची शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:12 PM
जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. याबाबत महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलनाची नोटीस प्रशासनाला देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने संघटनच्या सदस्यांची चर्चात्मक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी अनेक समस्यांवर समाधानकारक तोडगा काढण्यात आला.
ठळक मुद्देप्रलंबित मागण्यांवर चर्चा : समस्या सोडविण्याचे आश्वासन