लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूरची सहविचार सभा शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.या सभेला प्राथमिक शिक्षणाधिकारी दिपेंद्र लोखंडे, उपशिक्षणाधिकारी किशोर काळे, प्रशासन अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपिस्थत होते. या सभेत १८५ शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी तत्काळ मंजूर करावी, एमएससीआयटी वसुली संदर्भात कार्यवाही तत्काळ रद्द करण्यात यावी, नक्षलग्रस्त प्रोत्साहन भत्ता सुधारीत दराने देण्यात यावा, पात्र मुख्याध्यापक व विषय शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी तत्काळ मंजूर करावी, संवर्ग १ व संवर्ग २ मधील बोगस शिक्षकांची यादी जाहीर करून तत्काळ कारवाई करण्यात यावी, प्राथमिक शिक्षक रोष्टर अद्यावत करण्यात यावे, जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार १ तारखेलाच करावे, डीसीपीएस योजनेतून वगळलेल्या प्राथमिक शिक्षकांची रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये वळती करण्यात यावी, पात्र शिक्षकांची तत्काळ निवडश्रेणी मंजूर करावी, पाठ्यपुस्तके वाहतुकीचा खर्च उपलब्ध करून देण्यात यावा, बीएससीधारक विज्ञान शिक्षकाच्या वेतनातील त्रुटी दूर करावे, अप्रशिक्षित शिक्षकांना वेतनश्रेणी थकबाकी देण्यात यावी, शिक्षकांसाठी निवडश्रेणी प्रशिक्षणाचे आयाजेन करावे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभाग अध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, कार्यवाह रामदास गिरटकर, प्राथमिक विभागाचे राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर, प्राथमिकचे अध्यक्ष विलास बोबडे, कार्यवाह अमोल देठे, कोषाध्यक्ष नरेंद्र चोखे, कार्यालयीन सचिव अजय बेदरे, उपाध्यक्ष संतोष जिरकुंटावार, महिला आघाडी प्रमुख योगिनी दिघोरे, अर्चना काशिकर उपस्थित होते. या सर्व मागण्या वरिष्ठांना कळवून यावर तोडगा काढू, असे शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी यावेळी सांगितले.
शिक्षकांच्या विविध मागण्यांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 10:18 PM
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूरची सहविचार सभा शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी शिक्षकांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
ठळक मुद्देशिक्षक आमदारांची उपस्थिती : शिक्षक संघटनेने मांडल्या समस्या