परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, हातठेल्यांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. यामध्ये मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. शिवाय काही हॉटेल्स बाहेरुन चांगले दिसत असले तरी त्यांच्या किचनमध्ये अस्वच्छता दिसून आली. हा एकप्रकारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळच आहे. असे असतानाही अन्न व औषध विभाग मात्र निश्चिंत दिसून येत आहे.प्लास्टिकमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. म्हणून राज्यशासनाने प्लास्टिक बंदी केली. मात्र उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्यामुळे नागरिकांना विविध आजारांची लागण होते. उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रीवर विभागाचे निर्बंध नसल्यामुळे नागरिकांना या नाश्त्यासोबत आजार मोफत मिळत असल्याचे चित्र आहे.मागील काही वर्षात चंद्रपुरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. याशिवाय चंद्रपूर हे जिल्हा मुख्यालय असल्याने या ठिकाणी दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी येतात. त्यामुळे उत्पन्नाचे साधन म्हणून अनेकांनी हॉटेल्स, तर अनेकांनी हातठेल्यावर खाण्याचे पदार्थ विकण्याचा धंदा सुरु केला. खाद्य पदार्थाचा थेट संबंध आरोग्याशी असल्याने खाद्यपदार्थांची विक्री करताना काळजी घेणे गरजचे आहे. याकडे व्यावसायिकांचे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने अन्नपदार्थावर माशा बसतात. हे पदार्थ खाल्ल्यावर पोटाचे विकार होण्याची भीती असते. अनेकजण रोगांना बळी पडतात. एकीकडे मनपा प्रशासन, जिल्हा परिषद आरोग्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन करीत आहे हे विशेष.व्यावसायिकांकडून नियमांना तिलाजंलीहॉटेल्स व्यावसायिक, हातठेले आदीसाठी अन्न औषध विभागांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ नुसार विशेष नियम तयार केले आहेत. मात्र व्यावसायिकांकडून व हातठेलेवाल्यांकडून संपूर्ण नियम पायदळी तुडविण्यात येत आहेत. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.कारवाई नाहीअन्न औषध विभागाकडून संशयास्पद अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणाकरिता गोळा करुन त्यांची तपासणी करण्यात येत असते. त्यानुसार व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येते. मात्र चंद्रपूर शहरात सदर कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उघड्यावरील पदार्थांसोबत आजार मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:00 PM
शहर झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रतिष्ठाने, हॉटेल्स, हातठेल्यांची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. यामध्ये मात्र उघड्यावर अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. शिवाय काही हॉटेल्स बाहेरुन चांगले दिसत असले तरी त्यांच्या किचनमध्ये अस्वच्छता दिसून आली.
ठळक मुद्देप्रशासनाकडून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन : अन्न व औषध प्रशासन विभाग निश्चिंतच