लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गामुळे आर्थिक दुष्टचक्रात अडकलेले लहान-मोठे व्यावसायिक बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतानाच तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी लाल्या, मावा तुडतुडा रोगाने हवालदिल झाले. या कीडींचा कहर सुरू आल्याने बंदर, खडसंगी, भानसुली, माजरा व मुरपार परिसरातील धानाची शेती उद्ध्वस्त होणयाच्या मार्गावर आहे.झाडीपट्टीचा एक भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सुरूवातीपासूनच पुरेसा पाऊस झाल्याने धानाचे उत्पादन चांगले येईल, या आशेवर शेतकरी होते.
सद्यस्थितीत हलका व मध्यम धान कापणीसाठी आला आहे. मात्र जड वाणाचे धान कापण्याला २० ते २० दिवसांचा कलावधी आहे. कापणीसाठी आलेल्या धानावर लाल्या, मावा व तुडतुडा रोगाने आक्रमण केले. परिणामी, या रोगाचे बाधित क्षेत्र शेकडो हेक्टर झाल्याचे दिसून येत आहे. धानावर रोग येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक औषधी फवारणी केली. परंतु, काहीही बदल झाला नाही. त्यामुळे तोंडाजवळ आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला जाण्याची भीती वर्तवली जात आहे. असे घडल्यास या परिसरातील शेतकऱ्यांना यंदाही कर्जातच जगावे लागणार आहे. शासनाने तालुक्यातील धान पिकांच्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करून भरपाई देण्याची मागणी बंडू तराळे, अशोक श्रीरामे, कवडू दडमल, वैभव गायकवाड आदी शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहेकृषी विभागाचे दुर्लक्षबंदर येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी धानावर कीडरोग प्रतिबंधात्मक फवारणी केली. मात्र याला न जुमानता मावा तुडतुडा रोगाने पुन्हा शेकडो हेक्टर क्षेत्र बाधीत केले. कीड रोगाची माहिती कृषी विभागाला देण्यात आली. मात्र कुणीही बांधावर येऊन मार्गदर्शन केले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.कीडरोग नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी केली. पण उपयोग झाला नाही. अशावेळी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. याकडे कदापि दुर्लक्ष करू नये, अशा सूचना दिल्या. यंदा ब?्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून धानाची शेती केली. पीक हाती आले नाही तर जगायचे कसे हा प्रश्न सतावणार आहे.-अजहर शेख, सदस्य पंचायत समिती सदस्य, खडसंगी