लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात पोलिसांसाठी व्यायमशाळा सुरु करण्यात आली. मात्र या व्यायमशाळेत मासिक शुल्क ५०० रुपये आकारण्यात येत आहे. हे शुल्क शहरातील इतर व्यायमशाळेच्या तुलनेत जास्त असल्याने पोलिसांमध्ये नाराजीचा सूर आहे. परंतु कुणीही याबाबत पुढे येऊन मागणी करीत नसल्याची माहिती पोलीस सूत्राने ‘लोकमत’शी बोलताना दिली.पोलिसांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील तुकुम परिसरात सुसज्ज अशी व्यायमशाळा बांधण्यात आली. यामध्ये पोलिसांना प्राधान्य देण्यात आले. या व्यायमशाळेच्या बांधकामासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिला होता. मात्र देखभाल खर्च म्हणून पोलिसांकडून मासिक शुल्क ५०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. मात्र हे शुल्क इतर व्यायमशाळेच्या तुलनेत अधिक असून पोलिसांनी परवडण्यासारखे नाही.परिणामी अनेक पोलिसांनी या व्यायमशाळेकडे पाठ फिरवली असून इतर व्यायमशाळेमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे या व्यायमशाळेची शुल्क कमी करण्याची मागणी दबक्या आवाजात पोलीस करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर या पोलीस भरतीबाबत व्यस्त असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.शिवसेनचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनतुकुम परिसरातील पोलीस व्यायमशाळेतील शुल्क इतर व्यायमशाळेपेक्षा कमी असल्याने त्या व्यायमशाळेमध्ये प्रवेश घेणे, पोलिसांना परवडण्यासारखे नाही. त्यामुळे ही व्यायमशाळा पोलिसांसाठी मोफत करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांना दिले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलिसांसाठी ही व्यायमशाळा मोफत करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही.फिटनेस भत्ता कमीपोलिसांचे आरोग्य सुरळीत राहावे, यासाठी शासनाकडून २५० रुपये फिटनेस भत्ता देण्यात येतो. मात्र शहरातील व्यायमशाळेमध्ये या भत्यापेक्षा दुप्पट शुल्क आकारण्यात येत आहे.
व्यायामशाळेच्या अधिक शुल्कामुळे पोलिसात नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 11:21 PM
चंद्रपुरात पोलिसांसाठी व्यायमशाळा सुरु करण्यात आली. मात्र या व्यायमशाळेत मासिक शुल्क ५०० रुपये आकारण्यात येत आहे. हे शुल्क शहरातील इतर व्यायमशाळेच्या तुलनेत जास्त असल्याने पोलिसांमध्ये नाराजीचा सूर आहे.
ठळक मुद्देशुल्क कमी करावे : इतर व्यायामशाळेपेक्षा अधिक शुल्क