चिमूर : येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालय घेण्यात आले. यामध्ये फौजदारी, दिवाणी, ग्रामपंचायतचे टॅक्स,पाणीपट्टी, बँक, वीज कंपनीचे असे अनेक प्रकरणे लोकन्यायालायत ठेवण्यात आले. यामध्ये अनेक प्रकरणाचा आपसी समझोत्यातून निपटारा करण्यात आला. यातून लाखो रुपयांची समझोता राशी वसूल करण्यात आली.
न्यायालयात दाखल असलेल्या एकूण फौजदारी प्रकरणांपैकी ६९ प्रकरण लोकन्यायालायत ठेवण्यात आले होते. त्यापैकी ११ प्रकरणे आपसी समझोताने निकाली काढण्यात आले. या प्रकरणातून समझोता रक्कम म्हणून रुपये ७ लाख ९० हजार ५४९ रुपये वसूल करण्यात आले. तसेच एकूण दिवाणी प्रकरणांपैकी ३२ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यापैकी पाच प्रकरणे निकाली काढण्यात आली. बँक व मराविवि कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली. यामध्ये ५० हजार रक्कम रुपये वसुल झाले. विविध ग्रामपंचायतीचे घरटॅक्स व पाणी पट्टी करवसुलीची १४३ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी ४२ प्रकरणे निकाली निघाली असून ३ लाख ७८ हजार १८० रुपये वसुल झाले.
स्पेशन डाईव्हमध्ये एकूण ४८ केसेसचा निपटारा लागला असून १९ हजार ५०० रुपये वसुल करण्यात आले आहे. लोकन्यायालयाकरिता पॅनल प्रमुख म्हणून चिमूर दिवाणी न्यायाधीश आर. एम. भेंडे, ॲड. आर. आर. सोनडवले व सामाजिक कार्यकर्ता सुभाष शेषरकर यांनी काम पाहिले.
या लोकन्यायालयात सहभागी अधिवक्ता, पक्षकार, न्यायालयीन सर्व कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष आर. एम.भेंडे यांनी आभार मानले.