जिवती : तालुक्यातील शेडवाही ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या जोडण घाट येथील एक विधवा महिला व एक युवक या प्रेमीयुगलाचा तंटामुक्त समितीने बुधवारी बौद्ध रितीरिवाजानुसार विवाह लावला.
मौजा जोडण घाट येथील पौर्णिमा गोपाळ मसुरे व संदीप विलास मसुरे यांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. त्यांच्या म्हणण्यानुसार तंटामुक्त समिती आणि काही सामाजिक कार्यकर्ते यांनी बुधवारला जोडण घाट येथे बौद्ध रितीरिवाजानुसार लग्न लावून दिले.यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष हनुमंत कनाके, सामाजिक कार्यकर्ते नाभिलास भगत, माजी पंचायत समिती सभापती भीमराव मेश्राम, अशोक नामपले, हनुमंत कुमरे आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===Photopath===
250621\1340-img-20210625-wa0043.jpg
===Caption===
प्रेमीयुगलांचा विवाह लावताना उपस्थित