जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : कायमस्वरुपी कर्मचारी देण्याची मागणी चंद्रपूर : कोरपना ग्रामपंचयातीला नगरपंचायतचा दर्जा देण्यात आला. नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली. मात्र येथे एकही कर्मचारी कायमस्वरुपी देण्यात आला नाही. परिणामी नागरिकांच्या कामांचा खोळंबा होतो. त्यामुळे नगराध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी कायमस्वरुपी कर्मचारी देण्याच्या मागणीसह ईतर मागणीचे निवेदन नंदाताई बावणे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळानी जिल्हाधिकारी यांना दिले. कोरपना नगरपंचायतची निवडणूक झाल्यानंतर मुख्याधिकारी, अधिक्षक, इंजिनिअर व लेखापाल यांची तात्पूरती नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे हे कर्मचारी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस कार्यालयात येत होते. त्यामुळे अनेकांची कामे खोळंबत होती. त्याच स्थितीत मुख्याधिकारी भेलावे यांची उमरेड येथे तर अभियंता बोढे यांची बल्लारपूर येथे बदली करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी दुसरा कुठलाही कर्मचारी नियुक्त करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. म्हणून कामस्वरुपी कर्मचारी देण्याची मागणी नगराध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी याला देलेल्या निवेदनातून केली आहे. या शिष्टमंडळात नगराध्यक्ष नंदाताई बावणे, उपनगराध्यक्ष सय्यद मसुद अली तायर अली, सभापती मनोहर चन्ने, सभापती विजय तेलंग, सभापती रेखाताई चन्ने, नगरसेविका उज्वला धारणकर, नगरसेवक फरीदा ईस्माइल, नगरसेविका संगिता पंधरे, नगरसेविका कांताबाई भगत, नगरसेविका अर्चना पारखी, नगरसेविका शमशाद परवीन, नगरसेवक ज्योत्सना खोबरकर, नगरसेविका राधिका मडावी, नगरसेवक सुनिल बावणे, नगरसेवक महम्मद फरान अब्दुल वहाब उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)या आहेत मागण्याकायमस्वरुपी कर्मचारी देण्यात यावे, १४ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची परवानगी द्यावी, दलित वस्ती निधीतंर्गत नाली व रस्त्याच्या बांधकामास परवानगी द्यावी, नगरपंचायतची नवीन ईमारत द्यावी, गावात एलईडी बल बसवण्यासाठी निधी द्यावी अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
कर्मचाऱ्याअभावी नागरिकांच्या कामाचा खोळंबा
By admin | Published: October 27, 2016 12:50 AM