लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केला.यापुढे असे होऊ देणार नाही. भाजपकडे बहुमत आहे. संसद चालू ठेवण्यात आम्हीही समर्थ आहोत. मात्र आम्ही हातापायीवर उतरणार नाही. म्हणूनच काँग्रेसच्या निषेधार्थ हा उपवास केला, असेही ना. हंसराज अहीर म्हणाले.चंद्रपूर येथील गांधी चौकात सकाळपासूनच केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर उपवास कार्यक्रमाला बसले होते. त्यांच्या समवेत वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, आ. अॅड. संजय धोटे, भाजप जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, चंद्रपूर महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, मनपा स्थायी समिती सभापती राहुल पावडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, जि.प. समाजकल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे यांच्यासह भाजपप्रणीत नगर परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, नगरसेवक, जि.प. व पं.स. सदस्य उपवास कार्यक्रमात सहभागी झाले होते.देशात काँग्रेस विरोधकांनाही उचकवून लावण्याचे काम करीत आहे. सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या मानसिकतेत होती. मात्र यांना संसदच चालू द्यायची नव्हती. आमच्यावर जनतेची जबाबदारी आहे. जनतेने निवडून दिलेले आहेत. विकासाच्या दृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व होते. देशात सर्व सुरळीत चालू आहे. एखाद जातीय दंगलीची अप्रिय घटना देशात घडते, ती आम्हालाही मान्य नाही, असेही ना. अहीर म्हणाले.आंदोलनात अप्रिय घटना घडत असेल, तर अशी आंदोलने व्हायला नको. तरीही राईचा पहाड करण्यासाठी अशी आंदोलने केली जाते. अशावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी संबंधित राज्याची असते. २ तारखेला झालेल्या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र कायदा व व्यवस्था योग्यपणे हाताळली, याकडेही ना. अहीर यांनी लक्ष वेधले. सायंकाळी ५ वाजता उपवास कार्यक्रमाची ना. हंसराज अहीर यांच्या भाषणानंतर करण्यात आली. उपवास कार्यक्रमासाठी सकाळपासूनच जिल्ह्यातील कार्यकर्ते गांधी चौकात दाखल झाले होते.
अधिवेशन चालू न देणे हा लोकसभेचा अपमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:06 AM
काँग्रेसचा नेता जे बोलतात ते देशात कुणीही गांभीर्याने घेत नाही. आम्ही जनतेला गांभीर्याने घेतो. काँग्रेसने संसदेचे अधिवेशन चालू न दिल्यामुळे जनतेच्या विकासाचे मुद्दे तसेच राहिले. संसदेचा खर्च वाया गेला. हा लोकसभेचा अपमान आहे, असा आरोप केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केला.
ठळक मुद्देहंसराज अहीर : भाजपच्या उपवास कार्यक्रमात आमदारांसह अनेक सहभागी